Friday, 21 December 2018
गणिताच्या प्रेमात....
शाळा शाळा कशी अगदी आयुष्यभराची जणू सोबतीण झाली आहे की काय कोणास ठाऊक....पण म्हणजे अजूनही रमते मी तिथे...आणि अगदी विद्यार्थिनी प्रमाणे.... तिथे असलो की जबाबदारीची जाणीव असते पण वयाचे भान नसते... कारण सोबत निखळ मनाचे, निरागस वृत्तीचे, सहज सहभाव जपणारे आणि आपल्याशी निरपेक्ष तद्रूप होणारे छोटेसे विद्यार्थी असतात. त्यांना सांगायचे, समजवायचे, शिकवायचे, ओरडायचे, गप्पा मारायच्या, समस्या ऐकायच्या , त्यांची मस्ती, तक्रारी सहन करायची वा परतून लावायची , आणि त्यांना मोठे होण्यास मदत करत करत आपण स्वतः लहान होऊन जायचे ..... असे सगळेच कसे happening .....happening...
माझी मुले गणिताच्या प्रेमात अशीच पडली. त्यांची अशी मैत्री झालेली पाहून निम्मे काम झाले याचे समाधान मिळाले आणि त्यासाठी धनश्री ला खरेच thanks....छान कल्पना मांडली आणि चिकाटीने हो हो चिकाटीने ती पूर्णही केली.
Saturday, 27 October 2018
एक तास मराठीचा
आजची सकाळच शांत होती.... ठरवून मिळविलेली शांतता.
त्यात आज आमच्या विभागासाठी मराठी प्रशिक्षण वर्ग होता. विषयाशी संबंधित पाठांवर so called विवेचन असेल अशा काहीशा दृष्टीकोनातून मी बऱ्यापैकी फक्त आणि फक्त श्रोत्याच्या भूमिकेत होते. समाधान दादांना तयारी करताना बघून आपणही काही करावे का .....मग फलकलेखन केले. फलक लेखन करताना 'मन में लड्डू फूट रहे थे' ....अरे काय करत आहोत आपण...मस्त तारीख, वार, मार्गदर्शिका वीणा ताई पाटणकर यांचे नाव... पण एवढे लिहूनही कोरडेपणा जाणवत होता...मग स्वाभिमानाचे भरते आले ...आणि कार्यक्रमाची tag line लिहिली- लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी... थोडासा उर भरून आला...माझ्या स्वतःसाठीच वातावरण निर्मिती झाली आणि थोड्याच वेळात वीणाताईनी अगदी अनौपचारिकपणे व्याख्यान सुरू केले.
मराठी हा अध्यापनाचा विषय नसल्यामुळे पाठ्यपुस्तक , अभ्यासक्रम याविषयी माझी अगदीच उदासीनता होती. त्यामुळे नेमके कोठून ऐकू आणि कसे ऐकू याचा विचार सूरू होता. वीणाताई वातावरणात मोकळेपणा आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत होत्या. अक्षरनंदन येथे २०.२२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर , मराठीच्या प्रेमापोटी, त्या अशा प्रकारच्या प्रशिक्षणातून मराठी भाषेचा गोडवा शिक्षक, विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करीत होत्या. आपण जो यज्ञ सूरू केलेला असतो त्या यज्ञात आपण किती प्रकारे, नित्यनेमाने आहुती देवू शकतो ह्याचे त्या मूर्तिमंत उदाहरण होत्या.
मराठी भाषेच्या धड्यांचे तास अनुभविले होते. पण आजचा तास हा मराठी भाषा शिकण्याचा होता. पानसे बाईंची प्रत्येक वाक्याला आठवण येत होती.आमच्या नसानसात त्यांनी, मराठी भाषेवरील प्रचंड प्रेम, स्वाभिमान जागृत केला. आज त्या सर्व गोष्टींची जणू उजळणी होत आहे याची जाणीव होत होती. आपल्या भाषेला आपण मातृभाषा का म्हणत असू ह्याचे उत्तर आज स्पष्ट झाले. ही भाषा आपल्या व्यक्तिमत्वाला समृद्ध करीत असते. आपल्या भावना, आपली ग्रहणशक्ती, आकलन शक्ती, व्यक्त होण्याची कला हे सगळेच आपल्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे आहेत. मराठी भाषेच्या माध्यमातून हे कंगोरे विकसित होत असतात. मग एक अध्यापक म्हणून, व्यक्तिमत्व फुलविण्याचे साधन म्हणून, मराठी भाषेकडे पाहण्याचा दृष्टीकोन विकसित झाला.
पाठ्यपुस्तकातील पाठांचे एका मुख्य विषयांतर्गत एकत्रीकरण करून, विद्यार्थ्यांना त्यांचा एकत्रित अनुभव कसा देता येइल, यावर वीणा ताईची खरोखरच mastery आहे. व्याख्यानाची सुरुवात कल्पनाशक्तीला साद घालून, स्मरणशक्तीला ताण देवून विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती कशी वाढवायची याने झाली आणि हळूहळू हे व्याख्यान साहित्यकृती पर्यंत येवून पोहचले. अभंग, भारुड, ओवी, कथा, रूपक कथा.....जस जशी एकेक नवे येत होती तसतसे आपले वाचन किती मागे पडले याची खंत जाणवत होती. पुस्तके आपल्याला किती अद्ययावत करीत असतात हे सर्वश्रुत आहेच, पण विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे व्रत घेतले असेल तर आपण स्वतः किती समृद्ध असावे याची जाणीव या व्याख्यानादरम्यान प्रकर्षाने झाली. छोट्या खेळातून , कृतीमधून आपण भाषेला साद घालू शकतो. माझ्या शालेय आयुष्यात पानसे मिस महिन्याभराचा स्वाध्याय देत असत. महिनाभर आधी निबंधाचे ५ विषय देत होत्या. जेणेकरून तो विषय आणि त्यासंबंधीचे विचार यावर महिनाभर अभ्यास व्हावा. एवढे नियोजनबद्ध असायच्या बाबी...
प्रमाणबद्ध भाषा आणि बोलीभाषेचा लहेजा यावर देखील चर्चा झाली. भाषेचे सौंदर्य आपल्याला जपता आलेच पाहिजे, त्याचा गोडवा, ते साहित्य , ह्या बाबी त्या भाषेचा विशिष्ट ठेवा आहेत. अशा सर्व लोकांशी संवाद साधून त्यांना देखील त्यांच्या भाषेविषयी comfort zone आपल्याला देता आला पाहिजे.
असे एक ना अनेक मराठीची दालने आज माझ्यासाठी पुन्हा उघडली गेली. मनसोक्तपणे त्यामध्ये किती पाहू, किती वेचू, किती साठवू अशी तारांबळ देखील उडाली. दीर्घकालीन किती राहील हे आत्ता नाही सांगू शकत ....पण आज खऱ्या अर्थाने कान तृप्त झाले. आणि हे सर्व भाव ओळखूनच की काय पण व्याख्यानाचा शेवट 'मनकवडा मोर' या कवितेने झाला.....ज्याचे मोरपीस अंगावरून फिरल्याचा आनंद या वीणाताईनी नक्कीच दिला.
Monday, 15 October 2018
काकस्पर्श
दोन दिवसापूर्वी लोकसत्ता रविवार पुरवणीत ' दिसते तेच खरे असते' या मथळ्याखाली विज्ञानाधारित लेख होता. विज्ञानाची अध्यापिका असल्याने विज्ञान, 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' याच तत्वावर आधारित असते, हे मान्य करण्यास वेगळे कष्ट घ्यावे लागले नाहीत. मग तरिही दोन दिवसांपूर्वी डोळ्यांनी जे अनुभवले त्यास विज्ञानाचा आधार कसा देवू याभोवती विचार घोळू लागले.
आईचे बाबा, माझे आजोबा ज्यांना आम्ही 'मावशीचे बाबाच' म्हणायचो त्यांना देवाज्ञा झाली. वय झाले होते, आजारी होते. तशा सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या, समाधानी होते , पणतू , पणती ह्यांना डोळे भरून पाहिले होते, पत्नी आणि डॉक्टरच असलेल्या मुलीकडून अगदी उत्तम , तत्पर सेवा मिळाली होती, अशा मनुष्य म्हणून अपेक्षित असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. आता फक्त कधी बोलाविणे येते ह्याचीच वाट बघत होते. आणि हे बोलाविणे आले, घटस्थापनेच्या दिवशीच सकाळी ७.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या जाण्याचे दु:ख करावे की, भूतकाळ आठवून ...बरोबर ६ वर्षापूर्वीच याच दिवशी , याच वेळी नियतीने वेळ साधली होती आणि तेव्हा मृत्युशी झुंज देवून ते त्या आजारातून सावरले होते हे आठवावे हेच कळत नव्हते. तेव्हा जगण्याची इच्छा शक्ती होती, पण यावेळेस हा तृप्त जीव मृत्युशी भांडत बसला नाही. दरवेळेस देवीच्या दारी नतमस्तक होणारे आमचे बाबा याच दिवशी देवीपुढे लीन झाले. आणि तिनेही तृप्त होवून त्यांना या जन्मीच्या भोगातून मुक्ती दिली. बाबांना तीन मुली, मुलगा नाही, हा दिवस 'मातामह श्राद्धाचा' असतो हे कळल्यावर अजूनच प्रश्न पडले.
अगदी चार दिवसांपूर्वीच मी बाबांना भेटून आल्यामुळे, निवांत गप्पा मारल्यामुळे , अगदी म्हणजे अगदीच निवांत त्यांच्याजवळ बसल्यामुळे त्यांच्या जाण्यावर माझा विश्वास बसेना, आणि दुसरीकडे आपल्याला सुबुद्धी झाली आणि आपण त्यांना निवांत भेटलो याचे समाधान पण होते. यावेळेस पहिल्यांदा माणसाचे जाणे किती अनपेक्षित असते याचा जवळून अनुभव घेतला. त्यावेळेस त्यांना एकच गोष्ट सांगितली, "बाबा, मी तुमची एक गोष्ट कटाक्षाने पाळते- ऐकणाऱ्यालाच सांगायला जाते, समजूनही जे ऐकत नाही त्यांच्या नादीही लागत नाही". शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेताना प्रत्येकवेळी बाबांचीच आठवण येते. त्यांनी आमचे बालपण समृद्ध केले. अजूनही त्यांच्या कुशीत जावेसे वाटते. मध्यंतरीच्या काळात संपर्क जास्त होत नसला तरी आपल्या वर प्रेम करणारी , आपल्या वाढीत मोठे योगदान देणारी माणसे सहजासहजी दुरावत नाहीत.
दुसरा प्रसंग त्यांच्या सावडण्याचा.... १५ ते २० मिनिटे झाली नैवेद्य ठेवून.......... नुकताच पितृ पक्ष झालेला; त्यामुळे कावळ्याने नैवेद्य खाणे याबाबतीतील चर्चा खूपच ऐकल्या होत्या. मग हिंदू संस्कृती, परदेशातील या विधींचा अभाव, तंत्रज्ञान कोठे गेले आणि आपण काय करत आहोत या सगळ्या बाबी डोक्यात घर करतात, खरे काय ,खोटे काय, सिद्ध करण्यासाठी काय करायचे ;संस्कृत चा अभ्यास केल्यामुळे मंत्रांचे महत्त्व जाणविते आणि शास्त्र शिकल्यामुळे विज्ञानाला पुराव्याची गरज असते हेही पटते.
................ नैवेद्य खायला कावळा येईना, बाबांनी सांगितले होते माझा दहावा , तेरावा काही घालू नका, काही पाळू नका, मी खूप समाधानी आहे, मग हे समाधान चालीरीती च्या वेळी का दिसेना, पुन्हा एकदा विचारांची दिशा सुन्न. जाणत्या लोकांनी घरच्या मंडळीना पुन्हा पाया पडायला सांगितले, आई, ताई, सोन्यामावशी पाया पडले, आणि मनातील किंतु घालविणारे वाक्य बोलले आणि ....एकविसाव्या शतकातील माणसापुढे पुढच्याच दुसऱ्या क्षणात कावळा दिमाखात उभा होता. इतका वेळ कोठेही न दिसणारा तो कावळा क्षणार्धात प्रकट झाला, घास खाल्ला, नैवेद्याला एक फेरी मारली आणि निघून गेला. सगळेच निशब्द फक्त रडण्याचा आवाज.....आणि माझा विचारांचा प्रवास....... "दिसते तेच खरे असते" , कोणाला काही पटवायला जावू नये, त्याला त्याच्या अनुभवातून शिकायला लावावे.....आणि आपण स्वतः अनुभवाने समृद्ध व्हावे. जगात ऊर्जा असते....जशी सकारात्मक असते तशीच नकारात्मकही ऊर्जा असते. त्या उर्जेची रूपे अनुभवायची असतात.
बाबा, त्यादिवशी मिठी मारू की नको या विचारात मिठी मारलीच नाही.....अजूनही शांतपणे तुमच्या जवळ बसावे वाटते. तुम्ही कधीच टेंशन घेतलेले दाखविले नाही, पण तुमच्या डोक्यात असणारी काळजी ही नक्कीच जाणविली.....Thank you, बाबा
आईचे बाबा, माझे आजोबा ज्यांना आम्ही 'मावशीचे बाबाच' म्हणायचो त्यांना देवाज्ञा झाली. वय झाले होते, आजारी होते. तशा सगळ्या अपेक्षा पूर्ण झाल्या होत्या, समाधानी होते , पणतू , पणती ह्यांना डोळे भरून पाहिले होते, पत्नी आणि डॉक्टरच असलेल्या मुलीकडून अगदी उत्तम , तत्पर सेवा मिळाली होती, अशा मनुष्य म्हणून अपेक्षित असलेल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या होत्या. आता फक्त कधी बोलाविणे येते ह्याचीच वाट बघत होते. आणि हे बोलाविणे आले, घटस्थापनेच्या दिवशीच सकाळी ७.१५ वाजता त्यांची प्राणज्योत मालविली. त्यांच्या जाण्याचे दु:ख करावे की, भूतकाळ आठवून ...बरोबर ६ वर्षापूर्वीच याच दिवशी , याच वेळी नियतीने वेळ साधली होती आणि तेव्हा मृत्युशी झुंज देवून ते त्या आजारातून सावरले होते हे आठवावे हेच कळत नव्हते. तेव्हा जगण्याची इच्छा शक्ती होती, पण यावेळेस हा तृप्त जीव मृत्युशी भांडत बसला नाही. दरवेळेस देवीच्या दारी नतमस्तक होणारे आमचे बाबा याच दिवशी देवीपुढे लीन झाले. आणि तिनेही तृप्त होवून त्यांना या जन्मीच्या भोगातून मुक्ती दिली. बाबांना तीन मुली, मुलगा नाही, हा दिवस 'मातामह श्राद्धाचा' असतो हे कळल्यावर अजूनच प्रश्न पडले.
अगदी चार दिवसांपूर्वीच मी बाबांना भेटून आल्यामुळे, निवांत गप्पा मारल्यामुळे , अगदी म्हणजे अगदीच निवांत त्यांच्याजवळ बसल्यामुळे त्यांच्या जाण्यावर माझा विश्वास बसेना, आणि दुसरीकडे आपल्याला सुबुद्धी झाली आणि आपण त्यांना निवांत भेटलो याचे समाधान पण होते. यावेळेस पहिल्यांदा माणसाचे जाणे किती अनपेक्षित असते याचा जवळून अनुभव घेतला. त्यावेळेस त्यांना एकच गोष्ट सांगितली, "बाबा, मी तुमची एक गोष्ट कटाक्षाने पाळते- ऐकणाऱ्यालाच सांगायला जाते, समजूनही जे ऐकत नाही त्यांच्या नादीही लागत नाही". शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेताना प्रत्येकवेळी बाबांचीच आठवण येते. त्यांनी आमचे बालपण समृद्ध केले. अजूनही त्यांच्या कुशीत जावेसे वाटते. मध्यंतरीच्या काळात संपर्क जास्त होत नसला तरी आपल्या वर प्रेम करणारी , आपल्या वाढीत मोठे योगदान देणारी माणसे सहजासहजी दुरावत नाहीत.
दुसरा प्रसंग त्यांच्या सावडण्याचा.... १५ ते २० मिनिटे झाली नैवेद्य ठेवून.......... नुकताच पितृ पक्ष झालेला; त्यामुळे कावळ्याने नैवेद्य खाणे याबाबतीतील चर्चा खूपच ऐकल्या होत्या. मग हिंदू संस्कृती, परदेशातील या विधींचा अभाव, तंत्रज्ञान कोठे गेले आणि आपण काय करत आहोत या सगळ्या बाबी डोक्यात घर करतात, खरे काय ,खोटे काय, सिद्ध करण्यासाठी काय करायचे ;संस्कृत चा अभ्यास केल्यामुळे मंत्रांचे महत्त्व जाणविते आणि शास्त्र शिकल्यामुळे विज्ञानाला पुराव्याची गरज असते हेही पटते.
................ नैवेद्य खायला कावळा येईना, बाबांनी सांगितले होते माझा दहावा , तेरावा काही घालू नका, काही पाळू नका, मी खूप समाधानी आहे, मग हे समाधान चालीरीती च्या वेळी का दिसेना, पुन्हा एकदा विचारांची दिशा सुन्न. जाणत्या लोकांनी घरच्या मंडळीना पुन्हा पाया पडायला सांगितले, आई, ताई, सोन्यामावशी पाया पडले, आणि मनातील किंतु घालविणारे वाक्य बोलले आणि ....एकविसाव्या शतकातील माणसापुढे पुढच्याच दुसऱ्या क्षणात कावळा दिमाखात उभा होता. इतका वेळ कोठेही न दिसणारा तो कावळा क्षणार्धात प्रकट झाला, घास खाल्ला, नैवेद्याला एक फेरी मारली आणि निघून गेला. सगळेच निशब्द फक्त रडण्याचा आवाज.....आणि माझा विचारांचा प्रवास....... "दिसते तेच खरे असते" , कोणाला काही पटवायला जावू नये, त्याला त्याच्या अनुभवातून शिकायला लावावे.....आणि आपण स्वतः अनुभवाने समृद्ध व्हावे. जगात ऊर्जा असते....जशी सकारात्मक असते तशीच नकारात्मकही ऊर्जा असते. त्या उर्जेची रूपे अनुभवायची असतात.
बाबा, त्यादिवशी मिठी मारू की नको या विचारात मिठी मारलीच नाही.....अजूनही शांतपणे तुमच्या जवळ बसावे वाटते. तुम्ही कधीच टेंशन घेतलेले दाखविले नाही, पण तुमच्या डोक्यात असणारी काळजी ही नक्कीच जाणविली.....Thank you, बाबा
Tuesday, 18 September 2018
मोरेश्वरा
बाप्पा गेलास....पुन्हा एकदा भरभरून देवून गेलास!
या वेळेस मोजकाच ५ दिवसांचा तुझा मुक्काम.... दरवर्षी तुझ्यापुढे अथर्वशीर्षाचे आवर्तन करण्याचा माझा ध्यास....पण या वेळेस जबाबदाऱ्या आणि वेळ याचे नीटसे गणितच जमविता येईना! त्यामुळे हक्काच्या माणसालाच बगल दिली आणि तो हक्काचा तूच होतास! म्हणजे सगळ काही तुझाच उत्सव साजरा करण्यासाठी सूरू होते, पण या अथर्वशीर्षाच्या निमित्ताने तुझ्याजवळ जे अर्धा तासाचे शांत बसून बोलणे होत होते ते मात्र राहून गेले. याची खंत खोलवर जाणवत होती पण ती करत बसायला वेळ नव्हता.
पण बहुतेक तुला हे कळले असावे, तू असे काही अनुभव देतोस की कोणाला सांगितले तर म्हणतील आपल्याच मनाचे खेळ असतात. काहीही असो, रात्री अचानक अर्धवट झोपेत gas चालू आहे की काय अशी शंका येते आणि मी स्वयंपाक घराकडे धाव घेते, सगळे व्यवस्थितच होते हे पाहून सुखावते आणि जवळच विसावलेल्या तुला न्याहाळू लागते. मनात प्रचंड अपराधी पणाची भावना, आणि त्याच तीव्रतेने तुझ्या कारुण्यमय नजरेत रममाण होते. ती शांतता मला अजूनही जाणवत आहे.
तुझे माझ्या घरी येणे मला प्रचंड चैतन्य देते, प्रत्येक घरातील , प्रत्येक जातीतील तुझ्या सेवा करण्याच्या वेगवेगळ्या परंपरा ऐकते, त्यापैकी मी नेमके काय करायचे याचा अंदाज घेत असते, प्रत्येकाची विचार करण्याची , पुजेची रीत वेगळी आणि त्यामागील कारणेदेखील सबळ. शास्त्र काय सांगते, आमच्याकडे असेच करतात, ऋजुतावस्थेत पूजा वर्ज्य, सोवळे पाळावेच लागते, या धार्मिकतेसह आता पर्यावरण पूरक गणपती असे एक ना अनेक अटींसह तुझे येणे होते, मग मात्र मला मोठा श्वास घ्यावा लागतो.
तू माझा पाहुणा आहेस, 'अतिथी देवो भव' या तत्वाने "यथा ज्ञानेन यथा मिलितोपचारै:" मी ,'ऐकावे जनाचे...' असे एक ना अनेक ठेवणीतील वाक्यांचा आधार घेत फक्त आणि फक्त तुझ्या चैतन्यात समरस होण्यासाठी जे जे करता येइल ते ते करत असते. एखादी उपचाराची बाब नसेल तर चालेल, पण इच्छाच नसेल तर मात्र खटकेल.
माझ्यासाठी तू चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची देवता आहेस. अथर्वशीर्षातील प्रत्येक मंत्रोच्चार तुझ्या तेजाची प्रचीती देत असतो. ते तेज तुझ्या सहवासात अनुभवायचे असते. आपले आई वडील , मित्र हे आपल्या सगळ्यात जवळचे, पण त्यांच्याशी रुसवा धरला तर तुझ्या कुशीत येण्याशिवाय दुसरा मार्गच नसतो रे, किती चुका, अपराध पोटात घातले असशील, किती वेळा मदतीला धावून आला असशील, प्रत्येक वेळी भरभरून दिले आहेस, तुझ्या पासून काही लपवू शकत नाही, जे काही आहे ते केवळ आणि केवळ तुलाच समर्पित!
तुझ्या मिरवणुकीतील तो ढोल, तो ताशा, तो ध्वज, तो DJ , तो नाद मला आपसूक बेफाम करतो, मग तिथे शिस्तबद्ध की बेशिस्त हातवारे असा प्रश्न उभा करून त्या वर विवेकबुद्धी वगैरे वापरून मग कृती करण्याची सवलत मला घेता येत नाही. माझ्यासाठी तो फक्त नाद असतो, संचार असतो, तो फक्त एक प्रतिसाद असतो.
समर्पित भावना असते. त्या दिवशी तुझ्या डोळ्यात मला माझ्यासाठी जे कारुण्य दिसले ती माझी प्रेरणा आहे. खूप नकारात्मक गोष्टीमधून तू मला बाहेर काढलेस, तुझ्या सेवेत कोणत्याही तांत्रिक, पारंपारिक प्रथा, यामुळे खंड पडू नये एवढीच माझी इच्छा, जेव्हा असे घडते तिथे अपराधीपणाची भावना निर्माण होते. अनेक प्रश्नाची उकल माझ्याच पातळीवर शोधत आहे, कारण तुझ्या माझ्या संवादाचे नियम हे आपणच तयार केलेले असावे.
अशीच कृपा , वात्सल्य कायमस्वरूपी रहावो हे तुला सांगण्याची गरज नाही, पुन्हा एकदा मनाची तृप्ती, समाधान शांती देवून गेलास. पुढच्या वेळेस जेव्हा येशील तेव्हा तू दिलेल्या या तेजाचे प्रकटीकरण करण्याचेच माझे प्रयत्न चालू असलेले तुला दिसतील.
तुझीच सेवा करू काय जाणे!!!
Thursday, 16 August 2018
मुहूर्त मुहूर्त मुहूर्त ...अखेर एकदाचा मुहूर्त लागला आणि 10 वी अ मराठी माध्यम मार्च 1999 चा वर्ग तब्बल 19 वर्षांनी पुन्हा भेटला ...हो हो भेटला!!!! कारण पण तसेच प्रबळ होते, आमच्या सुमारे 4 वर्ष वर्गशिक्षिका असणाऱ्या पत्के बाईंचा निवृत्ती सोहळा ....मग त्यांच्या वर्गात आपली उपस्थिती नव्याने नोंदवून जुन्या आठवणी जगायच्या ...असा in short घाट घातला होता.
10 वी अ. .नावातच लक्षात येत असेल की एकदम हुशार विद्यार्थ्यांचा धडाडीचा वर्ग ..yes! आम्हाला आयुष्यात यश मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार ..जेथे जावू तेथ तेथ विजय मेळवू...अशा सगळ्या आविर्भावात असतानाच...मध्येच मी आणि सीमा ने हा सोहळा करण्याचा विचार केला . तब्बल 19 वर्षांमध्ये प्रत्येकी कडे 10 एक जणांचे number होते ...खंत अशीच होती की जो वर्ग संस्कृत पद्य स्पर्धा ,समूहगान स्पर्धा, अशा एक ना अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून एकी सिद्ध करत होता त्या वर्गाला आता एकत्र येण्याची इच्छा असूनही वेळ मिळत नव्हता वा काढता येत नव्हता. ..तरिही आम्ही वर्गातल्या 40 विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप group तयार केला आणि साद घातली, हळू हळू मागे लागलो. ...मागे कसले; पिच्छाच पुरविला !!!दिवस ठरला, वेळ ठरली, सर्वांना आमंत्रण गेली, सर्वांनी तयारी देखील दर्शविली आणि मग कार्यक्रमाची तयारी सुरु झाली. मी, सीमा, संपदा, सायली ,प्रिया, रोहन असे सगळे कार्यक्रमाचे स्वरुप ठरवू लागलो ..आणि एका कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते ते ठरवले.
प्रत्येक विद्यार्थी 19 वर्षांनी शाळेत येणार होता, इथून बाहेर जाताना त्याच्याकडे शाळेचे प्रतिक असावे जे आधुनिक पण असेल आणि शाळेला पण सूचक असेल . पत्के बाईंना पण आम्ही लक्षात राहिलो पाहिजे असचं gift त्यांना द्यावं म्हणून मीना प्रभूंच्या पुस्तकांचा संच आणि सीमा ने लिहिलेले भावपूर्ण मानपत्र देण्याचे निश्चित केले ...असे सगळे ठरले
. आणि 15 August आला ...वेळ पण झाली पत्के बाई देखील पोहोचल्या. . .मग विद्यार्थी ??? याच साठी केला होता का अट्टाहास !!!!असे काही बाही वाटू लागले, सीमा आणि माझा plan B फक्त 4-5 विद्यार्थ्यांचा presence या वर पण तयार होता, पण हा plan वापरावा लागू नये अशी मनस्वी इच्छा होती . 5S सीमा ,सायली, संपदा ,स्वप्नजा आणि स्मिता अशा शाळेत असताना च गट आलाच होता.... प्रसन्न ला फोन करताच पोहचतो म्हणत म्हणत, तो दाराशी दिसला आणि hushhh झाल ..मुलांची खिंड त्याने सांभाळली श्वेता नाझरकर आली, म्हणून आनंदाने टाळी वाजवेन तो पर्यंत नयना येणार नाही हे कळले आणि हिरमोड झाला . आख्खी विद्यार्थ्यांची roll number प्रमाणे हिची यादी तोंड पाठ ..अगदी आजही ! !एक एक करता करता सगळे जमले आणि मन शांत झाले
पत्के मिस आल्याच होत्या, पण देवळेकर सर आवर्जून पूर्ण वेळ उपस्थित राहिले आणि आम्हाला अग्रणी प्राग्रणींचे दिवस आठवले. मग अनौपचारिक गप्पा मारायच्या होत्या ... पण त्या देखील साचेबद्ध . शेवटी प्रबोधिनी चे बाळकडू ....
एक साथ खडे होंगे खडे हो... सावधान ..ओम् ...वंदन ..नमस्ते ! एकदम भारी ..शाळेत असताना आपण सावधान होईपर्यंत मिस खाली बसा अशा म्हणायच्या आणि आज. .सगळंच वेगळे होते.
आणि मग गीतेचा 15 वा अध्याय म्हणायला सुरुवात केली ....पाठ होता ..शेवटचे दोन तीन श्लोक जरा जरा डळमळले पण लहानपणी तयार झालेली जीभ अशी सहजा सहजी विसरत नाही हे मात्र नक्की. मग प्रबोधिनी पद्य क्षितिज नवे मज सतत बोलवी. . ..हे पद्य सन्मित्र बरोबर घेवून म्हटले ....प्रबोधिनिचा एक समान धागा पद्य, बर्ची, उपासना. ..कधीही भेटले तरी लगेच नाळ जुळवितात.
मग मी उभी राहिले ..इतके दिवस हा घाट का घातला हे आज सांगायचे होते ..एक आणि एकच कारण मनात होते - ते म्हणजे ..जरा विसावू या वळणावर. ..खूप कमविले ..पण हे सगळं कमविताना ज्यांनी आपल्याला सक्षम बनविले त्यांना आपण हे सांगणे लागतो. ह्याच साठी एकत्र जमविले . बास! आणि बाकीचे तर ज्याचे त्याला प्रत्येकाला कळले.
आठवणी जाग्या होवू लागल्या, कुठे कुठे वर्ग होते, सु्रुवातीला ह्या इमारती मध्ये काय होते इथ पासून ते आता वर्गात बसविलेले cctv पाहुन आपण बरे झालो या cctv च्या नजरेतून सुटलो इथ पर्यंतचे समाधान होते. कोणत्या तासाला कोण झोपा काढायचे आणि कोण ओरडणी खायचे, कोणत्या शिक्षिका काय शिक्षा द्यायच्या, का दिल्या, आणि आम्ही केलेले उद्योग ,( पत्क मिस ना चिठ्ठी प्रकरण चांगलेच आठवत होते, खूप hold वर ठेवले मी त्यांना) आणि आज शिक्षा कशा बदलल्या इथपर्यंत सगळं discuss केलं. दलाला जाताना गणवेश बदलणे, पथकश : राखी विक्री, अग्रणी पद कोणी गाजवले ,नेप्र चे अनुभव असे सगळे विषय discuss केले .लक्षात येत होत की हा वेळ अपुरा पडत आहे, नुसता स्पर्श करत आहोत, पण हा स्पर्श देखील सुखाचा होता .
मग देवळेकर सरांचे अनौपचारिक मार्गदर्शन झाले. आणि शाळेत परत येण्याचे कारण त्यांनी सांगितले ..या नव्या पिढीला बाहेरच्या जगात काय काय वाटा आहेत हे सांगण्यासाठी कधीही शाळेत या. .अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमची मदत होवू शकते . शाळेच्या प्राचार्य प्रज्ञा ताई पाटील, आमच्या इंग्लिश च्या शिक्षिका ह्यांनी देखील उपस्थिती नोंदवून आम्हांला आनंदीत केले.
आणि मग सीमाचे वर्गाच्या वतीने पत्के मिस साठी भावपूर्ण पत्र ,सगळ्यांनाच सद्गदित करणारे, वीस वर्षांपूर्वीचा आपला आणि मिस चा ऋणांनुबंध प्रत्यक्ष प्रकट करणारे असे ते ओघवते शब्द! !! सगळेच शांत. ..
मग आमच्या बाईंनी या पत्राला दिलेले उत्तर - मी फक्त तुमची आई बनण्याचा प्रयत्न केला. मला ज्या गुरुनी शिकविले ते मी तुमच्या पर्यंत पोहचवायचा प्रयत्न केला . खूप प्रामाणिक प्रयत्न !!
मग सायली ने games घेवून वातावरण relax केले . केदार वृंदा दीपा ह्यांना मिस करतच होतो ;त्यांनी video call ने उपस्थिती नोंदविली .आणि तंत्रज्ञानाने आपला सहभाग नोंदवला .तेजा प्राजा मजल दर मजल करत पोहचल्या आणि त्यांनी commitment पाळली . That's appreciable!!
मग पावभाजी पुलाव अशा मेनू वर ताव मारला. आणि मग गप्पांना पुन्हा रंग भरला .मग आपण असेच वर वर भेटलो पाहिजे या निकषावर सगळे आले आणि मी मनात hushhh म्हणाले .आणि पुढचा plan करणारा कोण ठरणार यासाठी सगळ्यांनी धनंजय कडे माना वळविल्या. अब आयेगा मजा 😂
Love u all...तुमची नेहमीच आठवण येत होती ..आज भेटलो. ..असेच भेटत राहू
Wednesday, 13 June 2018
Just let it be....if it's meant to be it will happen.....
नेटाने म्हणजे अगदीच नेटाने सगळं अनुभवायचे , आपल्या बाबतीत काय काय घडत आहे आणि कशा प्रकारे घडत आहे हे त्रयस्थतेने पहायचे, असे ठाम ठरवूनच सध्या मी वागत होते.
तर हे सगळं कशाच्या बाबतीत ......अगदी सुरुवातीपासून च्या आठवणी ....लहानपणापासूनच एक खेळ नियमाने खेळायचे....शिक्षिका शिक्षिका ..माझ्या वर्गातील मुले म्हणजे घरात असणाऱ्या फरश्या! मैत्रिणी घरी मुक्कामी आल्या तरी बिचाऱ्याना compulsory माझे विद्यार्थी बनावे लागत होते. नकळतपणे शिक्षिकेचा role हा DREAM ROLE झाला . माझे upbringing हे पुस्तकांच्या साथीत घडत होते .अवांतर वाचन तसे कमी होते ...अभ्यास अभ्यास हाच नुसता असायचा . पण तेथे रमायचे मी .कोणीही बळजबरी करत नव्हते. एकदा शिकविणे म्हणजे दोनदा शिकणे ही अशा स्वरुपाची philosophy अगदी ठाम होती. का कोणास ठाऊक ..माहित नाही पण इतरांच्या तुलनेत व्यवहार ज्ञान कमी होते की माझे लहानपणापासूनच शैक्षणिक क्षेत्रावर प्रेम होते (आंधळे ) ,नेमके कारण सांगता येणार नाही पण वैद्यकीय क्षेत्राचा प्रवेश नाकारून मी माझ्या वडिलांचा पहिला रोष ओढवला . बाकिचा शैक्षणिक प्रवास सुरू होता . पण त्या बाबतीत योग्य असे मार्गदर्शन आणि माझी धडपड कदाचित कमी पडली . B.Ed. ला प्रवेश घेतला तेव्हा तेथील विद्यार्थी हे by choice म्हणून या क्षेत्रात नव्हते तर आता फक्त एवढाच choice शिल्लक आहे हा साक्षात्कार झाल्यामुळे आले होते. मी मात्र अजुनही by choice म्हणूनच तिथे आले होते .5 मिनिटांच्या micro teaching मध्ये किती गोष्टी शिकवू शकतो हे बघून मला खरोखरच 5 मिनिटांची किंमत समजली. एखादी बाब समोरच्या व्यक्तीला समजावून सांगू शकलो ही जाणीवच समाधान देवून जाते .
ज्ञान प्रबोधिनी माझी शाळा, तिथेच काम करण्याची संधी त्यामुळे आनंदी होते. पण काही क्षण असे असतात जेथे तुम्हाला तुमच्या priorities ठरवाव्या लागतात . अशा वेळी by default तुमची priority तुमचा मुलगा आणि कुटुंब असते असे वाटले आणि प्रवास अर्धवट सोडला. सगळे निर्णय माझेच होते त्यामुळे त्यांची जबाबदारीही माझीच होती . पण माझे बालपणीचे प्रेम अधून मधून डोकावत होते. सासरची सगळीच मंडळी वकिली क्षेत्रात , मी या क्षेत्रात आले नाही ही खंत अण्णा ना (माझे सासरे ) नेहमीच वाटते. पण प्रेम मध्ये आले, स्वतःचा पिंड चांगलाच माहित होता. स्वतःशी प्रतारणा नाही करू शकत . मग guest lecture, संस्कृत चे class घेवून त्या वेळेस एकदम भारी वाटून घेत होते . संस्कृतची सुभाषिते, श्लोक खरोखर तत्त्वज्ञान सांगतात. एक एक सुभाषित हे itself जीवनाचे सार सांगतात . तुमच्या बुद्धिला खाद्य मिळाले की नवीन उर्जा मिळते , हे नक्की .
माझ्या priorities ह्या वेगळ्या आहेत ही खूणगाठ बांधली होती ,पण म्हणावे त्या आनंदाने कदाचित स्वीकारली नव्हती . Everything was fine...still something was missing.
आणि एक दिवस ज्ञान प्रबोधिनीतून पुन्हा offer येते , सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेने जुळून येतात की वाटावे कोणीतरी हळूवार जादूची कांडी फिरवत आहे. ह्या गोष्टी अशा दिवशी , अशा वेळी घडून याव्या की अद्वैत शक्तीच्या अस्तित्वावर तुमचा विश्वास अजून दृढ व्हावा आणि कोणी मान्य करो वा न करो , आपण केवळ त्या अनुभूतीत रमावे . एकदम विलक्षण असे . आयुष्यात नेमके missing काय आहे हे समजावे ...नव्हे गवसावे....त्याच वेळी ठरवले आता फक्त त्रयस्थतेने काय आणि कसे घडते हे पहायचे ...
या नव्या वाटेवरचा आजचा पहिला प्रवास ...खूप शांतपणे नेहमीच्याच वाटेवरून नव्याने गेले...ज्योतिर्हम .... उपासनेतले हे शब्द मनाला स्पर्शून जावे ...अगम्य अशी शांतता ...स्वतःच्या क्षमतेची पुनर्तपासणी , स्वतःच्या निर्णयाची चाचपणी, भविष्यातील कार्याविषयी अंदाज , ठोकताळे, सगळंच साठवून ठेवावे असे.
महेंद्रभाईंचे वाक्य मनापासून पटले Analysis analysis leads to paralysis...खूप चिकित्सा करण्यात खरोखर अर्थ नसतो . एक quote आठवतो -Never expect
Never assume, Never ask and never Demand, Just Let it be ., if it's meant to be it will happen.
Really happy for the things which are happening. Thanks to wellwishers.
Sunday, 20 May 2018
Thailand स्त्री साम्राज्य
नुकतीच Bangkok -Pattaya अशी 4-5 दिवसांची छोटी trip करून आले. छान निवांतपणा मिळाला. अजिबात घाई गडबड नाही ,पळापळ नाही. मनाला वाटेल तेव्हा आजुबाजूच्या परिसरात एक चक्कर मारून येणे , सकाळच्या वेळेत ठरवलेले sight seeing करणे, असा सहलीचा मस्त आराखडा होता. आयुष्यात नुकत्याच घडलेल्या शारीरिक, मानसिक अस्थिरतेपासुन बाहेर पडण्यास एक खूप छान break मिळाला. म्हणूनही ही trip अजून महत्त्वाची ठरली .
Thailand बघायला गेलो तर एक छोटासा बेटवजा देश . कमी लोकसंख्या असणारा , लोकशाही असणारा देश. प्रगत की अप्रगत हे exactly सांगता नाही येणार , पण देशाची प्रगती जर Basic infrastructure वर अवलंबून असेल तर त्यांचे लांब , रुंद रस्ते, उड्डाण पुले , उंचच उंच इमारती (for hotels only), पर्यटन स्थळांचा maintainance, या सगळ्या वर घेतलेली मेहनत, aदेश प्रगती पथावर असल्याचे सूचित करत होता . देशात सध्या 4 वर्षे अंतर्गत कलहामुळे निवडणुका झाल्याच नाहीत आणि आता सध्या लष्कराचे नियम लोकांना पाळावे लागत असल्याचे आमच्या tour guide ने सांगितले . पण सगळीकडे देशाच्या राजाचे आणि त्याच्या मुलाचे भारदस्त photoes, हो photoes च म्हणू शकतो🙊, आपल्याकडे banners असतात 😹,आपल्याला बघायला मिळतात.
तिथे जी कोणी Thai मंडळी भेटली ती अतिशय नम्र , मधाळ आणि लांबलचक सूर लावून बोलणारी होतीa. madam ला 'मदाम' म्हणून, आदरयुक्तपणे, लडिवाळपणे आपले तोडके मोडक English आपल्या गळी उतरवत होती. एवढा पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला देश, पण जागतिक भाषा इंग्लिश न येण्याचे guilt एकाही Thai मंडळी च्या चेहऱ्यावर मला दिसले नाही. नाही कळले तर, हातवारे करतील किंवा Google बाबा च्या google translator चा आधार घेतील, पण sorry, i don't understand English असा सूर त्यांच्या कडून कधीच आला नाही ...असा सूर मला नेहमीच आपल्याकडे प्रकर्षाने जाणवतो.. .कारण आपलं नेहमीच इंग्रजांच्या वाचून अडते. असो ..हा सध्या माझ्या अभ्यासाचा विषय नव्हता ...फक्त एक दुखरी नस .
त्यांच्याकडे vegetarian and nonvegeterian असा काही प्रश्नच नसतो. ते एक फक्त पोटाला लागणारे , सहजरित्या उपलब्ध असणारे अन्न असते . शाकाहारी लोकांनी आपापल्या risk वर आपले अन्न शोधून काढावे. तसे एवढे कष्ट पडत नाहीत त्यासाठी, कारण almost दोन restaurant नंतर तुम्हाला Swagath, little India, Madras Darbar, Great Punjab असे अनेक भारतीय पद्धतीचे जेवण देणारे हॉटेल्स दिसतात आणि त्यावरुन लक्षात येते Thailand ला जाणाऱ्या भारतीयांची संख्या किती असेल!! ज्या हॉटेल्स मध्ये उतरलो होतो ते 15-16 मजली हॉटेल्स वेगळे Indian रेस्टॉरंट चालवू शकतात, कारण भारतीयांचे तिथे जास्त प्रमाणात येणे जाणे आहे . थोडक्यात त्यांची Economy ही भारतीय आणि Chinese यांच्यावर अवलंबून आहे . तिथे Indian Town आणि China town अशी दोन नगरे वसलेली आहेत .
देशाचा मुख्य धर्म हा बौध्द हाच आहे. बुद्घांच्या अजोड अशा उंचपुऱ्या, शांत, प्रसन्न मुर्त्या बघून बौध्द धर्माच्या तत्वांची खऱ्या अर्थाने साक्ष पटते आणि अभ्यासपूर्वक बौध्द धर्म स्विकारणारा संन्यासी किती धीरगंभीर वृत्तीचा असू शकतो याची कल्पना आली . सम्राट अशोकाने आपल्या मुलांना या धर्माच्या प्रसारासाठी त्या ठिकाणी पाठविले होते असा इतिहास आमच्या अहो नी च मला सांगितला ....
Sight seeing मध्ये मुख्यत्वे आम्हाला wild life चाच परिचय, अनुभव आला . Sriracha Tiger zoo आणि Safari world मध्ये प्राण्यांना ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले होते ते खरोखरच प्राण्यांच्या आकलन शक्ति च्या बाबतीत आणि माणसाच्या आवाक्याच्या बाबतीत अचंबित करणारे होते. प्राण्यांची ज्या प्रकारे निगा राखली जात होती , तेथील स्वच्छता , प्राण्यांना उपलब्ध असलेली प्रशस्त जागा या बाबी,p पर्यटनामुळे मिळणारा पैसा योग्य प्रकारे वापरला जात असल्याचेच द्योतक होता. म्हणजे जी प्रणाली यासाठी कार्यरत होती ती खरोखरच स्तुत्य होती. Crocodile show, tiger show हे जिवावर बेतणारेच show होते . भले आपले मनोरंजन होत असेल पण कुठेतरी त्या माणसाबद्दल, प्राण्यांबद्दल करूणा वाटल्याशिवाय रहात नाही.
आणि हो आता जरा मुख्य मुद्द्याकडे येते. ..या देशाची सगळी economy सांभाळणारी , या hospitality चा मुख्य आधार असणारी, त्यांच्या लोकसंख्येचा अधिक भाग असणारी त्यांची स्त्री शक्ती . हॉटेल्स म्हणू नका , sea island वरील sports चे management म्हणू नका , प्रत्येक दुकानांमध्ये त्यांचा मालकीवजा वावर। मग ते street food shop असो , Thai massage असो किंवा मोठ्या malls मधील shops असो, किंवा gems sovenier मधील दागिन्यांची घडणावळ असो, प्रत्येक ठिकाणी या हजर. स्वतः च्या fitness ची , सौंदर्याची , त्वचेची काळजी घेत या तुमच्या सेवेला हजर . तिथे ही कामे पुरुषांची आणि ही स्त्रियांची अशी विभागणी नाहीच. मोपेडवर स्वतः च्या food shop मध्ये आवश्यक असणारी सामग्री मोठ्या प्रमाणात आणण्यासाठी याच सज्ज दिसत होत्या, रस्त्यांवर काही डागडुजी, खोदकामं चालू असतील तर full covered टोप्या घालून या महिलाच कामं करत होत्या . पर्यटकांना दुसऱ्या island वर घेवून त्यांचे management करणाऱ्या आणि safari world, tiger zoo अशा wild life बरोबर लीलया वावरणार्या याच होत्या. Then it doesn't matter it is Big Tiger or tiger cub or any owl !
त्यांच्या साठी हे एक काम आहे आणि मला जगायाचे असेल तर ते काम मलाच करणे गरजेचे आहे . हे काम मी कसं करू? अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. It's just struggle for existence phenomenon. माझा एवढा अभ्यासही नाही , मला दिसणाऱ्या गोष्टी केवळ tip of iceberg असतील, पण काही बाबी जेव्हा कायद्याने मान्यता दिलेल्या असतात, तेव्हा या स्त्रिया किती प्रमाणात practical आणि mentally prepared असतील याची मी कल्पनाही करू शकत नाही . May be त्यांचे upbringing ज्या परिस्थितीत झाले त्या परिस्थितिने त्यांना तग धरायला शिकविले असेल . कारण एवढी कष्टाची कामे करुनही स्वतःचा नाजूक पणा त्यांच्याकडे अबाधित होता . आमची guide खूप सहजपणे सांगून गेली I have son of age 17. मग आपल्या संस्कारांना अनुसरून आमचा पुढचा प्रश्न तिच्या नवऱ्या विषयी होता आणि तिने तेवढ्याच सहजतेने उत्तर दिले I have no husband...we don't expect anything from him. We just let him to go. Don't insist him to take our responsibility. As per our Government rule Mother has whole responsibility of her child and not THE father.
ही वाक्ये माझ्या पचनी पडणारी नक्कीच नव्हती . पण तिच्या साठी हे सहजरित्या (?)स्वीकारलेले सत्य असावे अशा सुरात ती बोलत होती. स्त्री कणखर असते हे मला माहिती होते पण तिच्या मधील मातृत्व तिला कणखर बनवते हे नक्कीच त्या दिवशी पाहिले .
Darwin चे जगण्या बद्दलचे नियम अजून दृढ झाले . देशाची आर्थिक व्यवस्था जी स्त्री स्वतःला पणाला लावून सांभाळते तो देश प्रगत म्हणायचा की अप्रगत हे मला लक्षात येत नाहिये ..पण तेथील कार्यक्षम स्त्री नक्कीच प्रगत. तिच्या साम्राज्यास माझा तिच्या सारखाच लडिवाळ नमस्ते 🙏😘
Tuesday, 24 April 2018
शांत व्हायचंय। त्या शांतीची जी काही depth असेल ती अनुभवायची आहे.एक प्रकारचे स्थैर्य , स्थिरता आणि ते पण दीर्घकाळ टिकेल याची ग्वाही हवी.
ही मनातील खलबतं थांबतच नाहीत. म्हणजे, आयुष्यात काही तरी सतत happening घडावे, अनुभवायला मिळावे, याचा सतत अट्टाहास सुरू असतो;पण ह्या सगळ्या गोष्टी मनातच एवढा उच्छाद मांडतात की, त्यांचा कधी कधी गोंगाट होतो आणि happening गोष्टींची चलबिचल मनाच्या चौकटीपर्यंतच येरझार्या घालते आणि productivity मात्र पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही.
ही खलबतं बघायला गेलो तर -स्वीय ,कौटुंबिक ,सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा प्रत्येक पातळीवर आपण लढत असतो आणि त्याच्या प्रासंगिक either झळा or झुळूक आपल्या वाट्याला येतात आणि मग तद्नुसार विचारांची आंदोलने हेलकावे घेऊ लागतात.
ह्या आंदोलनांचा base पकडायचा म्हटलं तर, हा पूर्ण प्रवास हा अपेक्षाांच्या शिदोरीवर अवलंबून आहे either समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून असलेल्या or आपल्यालाच त्या व्यक्तीकडून किंवा स्वतः कडून असलेल्या अपेक्षा !!सूत्र एकच अपेक्षा !!!स्तर भले emotional असेल वा practical. सगळेजण या अपेक्षाच कुरवाळत असतात🙊
वयपरत्वे, कालपरत्वे ,अनुभवाने, भले तुमचा रोल बदलत असेल पण हा बदल केवळ अपेक्षाांच्या formatमध्ये घडलेला असतो .घडणाऱ्या घटनांचे कालपरत्वे फक्त repetition होत असते. खिलाडू वेगळे.इथला प्रत्येकजण मी किती खरा, मी किती सरस, हेच सिद्ध करण्याच्या मागे ....
स्वतः चे अस्तित्व वलय निर्माण करण्यासाठीची ही पळापळ.....
आयुष्य सुंदर रेखाटण्यासाठी अपेक्षाांचे रंग मदत करतातच ..पण अतिरेक रंगाचा बेरंग करू शकतात, हे दुर्लक्ष करून चालणार नाही .डोळे बंद केल्यानंतर आपल्याला अपेक्षित असलेले चित्र बघायचे असेल तर ,कुंचला नीट धरता आला पाहिजे ;रंग पारखून घेतले पाहिजे;
पुन्हा अपेक्षित चित्र .......ही अपेक्षा खरंच पाठ सोडत नाही😷
स्वतः च्या कोशात राहून, आवडीच्या गोष्टींमध्ये रमून, गाण्यांच्या सूरांबरोबर शब्दांबरोबर स्वतः ला connect करून,आपल्याबरोबर tuned असलेल्या माणसाबरोबर गप्पा मारून, आईच्या मांडीवर डोके ठेवून, ही शांतता लाभेल फक्त तिच्या स्थिरतेची शाश्वती देता येत नाही....😐
स्वतः स्वतः पासून अलिप्त झाल्यावर जी शांतता लाभेल कदाचित मला ती शांतता अभिप्रेत असेल !!मान्य आहे त्यासाठी संन्यासी च व्हावे लागेल 💁
दुनियादारीशी संबंध आला की बाकी कुठे नसलं तरी मनात सतत happening घडतंच राहणार. त्रयस्थपणे फक्त त्यांचे साक्षीदार बनूया....
Take care!🙏
Tuesday, 27 March 2018
Chillax.....
माझ्या शब्द कोशामध्ये नवीन शब्दाची भर पडली . Chill आणि relax यांच्या एकत्रीकरणातून Chillax ची उत्पत्ती झाली. .आणि याचे जनक म्हणजे सध्याचा teenage group..जो त्यांच्या आई वडिलांना शांत करण्यासाठी, प्रेमाचा सल्ला म्हणून CHILLAX हा शब्द प्रयोग करत आहे. अर्थातच या शब्द प्रयोगाने आई वडील शांत होत आहेत की अजूनच tense हे त्यांच्या प्रकृती वर अवलंबून आहे.
मी मात्र chillax ऐकून जरा curious झाले.
एक वेगळ्या धाटणीचा शब्द प्रचलित झाला आणि तो आपल्यापर्यंत पोहचला याचा भलताच आनंद मला झाला. 'Swag से करेगे सब का स्वागत ';अशा attitude मध्ये मला chillax शब्द प्रयोग करावा अशी प्रचंड इच्छा निर्माण झाली . किती cool...cooler...coolest approach..तो पण teenager चा.
या अनुषंगाने दोन गोष्टी प्रामुख्याने माझ्या समोर आल्या; एक तर, भाषेत प्रचंड वेगाने होत जाणारा बदल ,प्राकृत मराठी पासून , शुद्ध मराठी, प्रादेशिक मराठी, सदाशिव पेठ मराठी, असा सगळा मातृभाषेचा अभिमान जपणारा आपला गट हळुहळू Minglish, whatsapp marathi , english shortcuts, english combo असे काय काय नवे प्रयोग करत आहे आणि मुख्यत्वे हे बदल खूप सहज स्वीकारले ही जात आहेत. त्या मागचे एक कारण- जर हे भाषेत होणारे बदल मी स्वीकारले नाहीत, तर या communication च्या जगात मी मागे पडेल.. .so,मातृभाषेचा आदर मनात सदोदित उराशी बाळगून ,सद्य स्थितीत chillax राहून मी हा बदल आत्मसात करणार ...कारण मला सध्या जगाची भाषा कळणे आणि येणे जास्त महत्त्वाचे आहे . अजून दहा वर्षांनी जेव्हा माझा मुलगा या teenage चा घटक बनेल तेव्हा हा शब्द कोश किती आणि कसा 'प्रगल्भ ', 'संपन्न' असेल याची मी कल्पना करु शकत नाही परंतु, त्या साठी mentally prepare राहू शकते, हे मात्र नक्की.
दुसरी बाब हा chillax म्हणणारा गट , एखाद्या घटनेची तीव्रता ओळखून ,परिणामांची कल्पना ठेवून, त्या परिणामांना सामोरे जाण्याची पात्रता असणारा असल्यामुळे, प्रगल्भतेपोटी हा शब्दप्रयोग करत आहे का ?जर तसे असेल तर, त्यांचे हे वागणे कौतुकास्पद आहे ,कारण spiritual development आपल्याला सरतेशेवटी प्रत्येक घटनेचा शांतपणे च विचार करायला सांगते . ही अभिप्रेत असणारी शांती मिळविण्यासाठी सध्याचा प्रौढ वर्ग अनेक meditation ची दारे वाजवित आहे . प्रगल्भ teenage ला (?) हे अशाप्रकारे शांत राहणे लवकर लक्षात आले ;याचा नक्कीच आनंद
पण chillax शब्दप्रयोग करताना प्रत्येक गोष्ट lightly च घ्यायची ही प्रवृत्ती असेल तर, मात्र थोडी काळजी नक्कीच वाटेल. कारण कशाचा काही फरकच पडणार नसेल तर ....जगणे कोरडे बनेल ....chillax चा शेवट कोरडे पणात नसावा ...नाहीतर हळू हळू ही शांती आपल्यालाच खायला उठेल !!!
शब्दांची गंमत, भाषेतील बदल, हे काळानुरूप घडतच राहणार .. त्यात शंका नाही. ..पण एखाद्या वाहिनी वर 'मी मराठी' हे गाणे ऐकून वा 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे पद ऐकून क्षणभर काळजाचा ठाव घेतला गेला नाही तर मात्र ही वृत्ती आक्षेपार्ह ठरेल. .....
आई वडिलांना Chillax म्हणताना त्यांच्या मनातील काळजीचा वेध घेता येणार नसेल तर ही वृत्ती देखील आक्षेपार्ह ....आई वडिलांचे आयुष्य chill आणि relax ठेवण्याचे दायित्व आपल्याला chillax राहून घेता येईल का यावर एकदा फिरून विचार व्हावा ....एवढंच म्हणणे
Happy with this new word
Monday, 12 March 2018
अनाकलनीय
आज cocktail हा पिक्चर बघत होते. माझ्यासाठी काही चित्रपट हे ठेवणीतले असे आहेत , Jab we met, Namaste London, 3 idiots, कट्यार काळजात घुसली, .. त्यापैकीच Cocktail हा एक . या चित्रपटामध्ये कोणताही समान धागा नाही , तरीही ते मला एका जागी खिळवून ठेवतात हे मात्र नक्की . शेवटी 'चित्रपट' ही व्याख्या पूर्ण होण्यासाठी , त्यांचा शेवट हा गोड होणारच पण; ती जी overall process आहे ना ,ती मनाला स्पर्श करुन जाते ...किंबहुना ,तिचा प्रभाव, हा दिर्घकाळ टिकतो.
Cocktail मध्ये सैफ चा एक dialogue आहे, "मै ऐसा हो ये कभी नही चाहता था "(when he finally fell in love with Diana), पण, Alas!! घडलेच ... पिक्चरच तो ...घडून येणारच होते असे .
पण ज्या पध्दतीने घडले ती process खूपच आगळी होती .
आपण खरोखरच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत mentally prepared नसतो. हे फक्त प्रेम किंवा तत्संबंधी नाही. ...खरोखरच आपण खूप साऱ्या बाबतीत prepare नसतो, आपली acceptance level तेवढी powerful नसते आणि मग त्यांचा प्रभाव वाढत गेला की आपले calculations चुकू लागतात ...अरे, अस घडावे ? माझ्या बाबतीत घडावे? कस शक्य आहे हे? ही phase किती दिवसांची सोबती? कस निभावून नेणारे सगळ? असे अनेक प्रश्न.. ...आपण किती strong आहोत हे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहित असते . मग calculations बरोबर येण्यासाठी आपण manipulation करु लागतो .
त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा घाट सुरू होतो. उत्तरे शोधत आहोत की अजून खोल गर्तेत जात आहोत हे सर्वस्वी आपल्या कौशल्यपूर्ण विचारांवर आधारित असते .
कार्यकारणभावावर सगळा खेळ सुरु असतो. ही जी कार्य कारणभावाची अनाकलनीय अशी process आहे ना ती मला खूप important वाटते. कारण शेवट तर नेहमीच गोड होणार असतो , या शेवटाकडे जाताना तुम्ही ज्या पध्दतीने तग धरता...That sounds your perfection 😌
तुम्ही म्हणाल एवढा छान हलका फुलका चित्रपट , relax व्हायच की तत्त्वज्ञान शोधत बसायचे 😺 परंतु हलक्या फुलक्या गोष्टीतूनच जीवनाचे मर्म कळते ना ...लहानपणीच्या गोष्टी आजही आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात .
मला समजलेला मानवी स्वभाव म्हणजे कोणत्याही प्रसंगात माणूस त्या ठिकाणी स्वतःला judge करत असतो , चित्रपट तर त्याची हक्काची जागा!!!आपण काय केले असते बरे ? किंवा या गोष्टींपासून आपण दूर आहोत हेच बरे! !!कदाचित माझा हा विचार स्वाभाविकच असावा .
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आपण विचार करो वा न करो, आपण Strong असो वा नसो, त्या घडत राहणारच. तुमचे calculations पुर्ववत करावयाचे असतील तर तुम्ही किती लवकर त्या घटनेचा स्वीकार करता यावर गोष्टी अवलंबून असतात. ..
Afterall हे आयुष्य, अनाकलनीय बाबींचा उलगडा करण्याचा एक महायज्ञ ...सो आप चाहो या ना चाहो ;हे सगळं घडत राहणार आणि या महा यज्ञ तुम्हाला तुमची आहुती द्यावी लागणार. ..शेवटी इदम न मम ..हाच गोड शेवट ना !!,😊
Wednesday, 7 March 2018
स्वच्छंद हितगुज🐤
मनामध्ये खूप गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. आपली विचार करण्याची सवय, त्यावर झालेले संस्कार, आजूबाजूची परिस्थिती ,त्यांना मिळालेले exposure या आणि अशा अनेक बाबींवर, आपली प्रगल्भता अवलंबून असते. आपले विचार व त्या नुसार घडणारी आपली कृती ही ,आपल्या प्रगल्भतेच द्योतक असते😌 .
प्रत्येक माणसाशी, हे सत्य निगडित आहे. जन्मापासून मरेपर्यंत जर मोजदद करण्याची ठरविली, तर infinite प्रसंग आपण अनुभवलेले असतात.
सामोरी येणारी व्यक्ती आपल्याला कधी प्रेमळ भासते, तर कधी रगेल, कधी प्रचंड aggressive, तर कधी friendly. तिची कृती ही, तिच्या अनुभव संपन्नतेवर आधारित असते . अगदी सहज म्हणून कधी माणसांना observe केलं, तर लक्षात येत कुठे ना कुठे, प्रत्येक माणसामध्ये एक innocence, निर्मळता नक्की असतेच. तरीही त्यांचे पुर्वनुभव त्यांना निर्भेळपणे व्यक्त होण्यापासून अडवतात. आणि हे अस व्यक्त होणे रोखले गेले की संवाद खुंटतात.😐
अस खुंटलेल विसंवादि आयुष्य किमान आपल्या नशिबी नको म्हणून व्यक्त होणे माझ्यासाठी खूप महत्वाचे.. .त्यासाठी माणसे जपणे. कारण सरतेशेवटी We all sail in same boat.
मग प्रवास सुखकर होण्यासाठी हा व्यक्त होण्याचा घाट. .
काहींना काही निमित्ताने भेटत राहू, बोलत राहू , जगत राहू आणि आपण जिवंत मनाचे आहोत हे कमीत कमी स्वतःला सांगत राहू .
धन्यवाद 😊
मनामध्ये खूप गोष्टी साठवून ठेवलेल्या असतात. आपली विचार करण्याची सवय, त्यावर झालेले संस्कार, आजूबाजूची परिस्थिती ,त्यांना मिळालेले exposure या आणि अशा अनेक बाबींवर, आपली प्रगल्भता अवलंबून असते. आपले विचार व त्या नुसार घडणारी आपली कृती ही ,आपल्या प्रगल्भतेच द्योतक असते😌 .
प्रत्येक माणसाशी, हे सत्य निगडित आहे. जन्मापासून मरेपर्यंत जर मोजदद करण्याची ठरविली, तर infinite प्रसंग आपण अनुभवलेले असतात.
सामोरी येणारी व्यक्ती आपल्याला कधी प्रेमळ भासते, तर कधी रगेल, कधी प्रचंड aggressive, तर कधी friendly. तिची कृती ही, तिच्या अनुभव संपन्नतेवर आधारित असते . अगदी सहज म्हणून कधी माणसांना observe केलं, तर लक्षात येत कुठे ना कुठे, प्रत्येक माणसामध्ये एक innocence, निर्मळता नक्की असतेच. तरीही त्यांचे पुर्वनुभव त्यांना निर्भेळपणे व्यक्त होण्यापासून अडवतात. आणि हे अस व्यक्त होणे रोखले गेले की संवाद खुंटतात.😐
अस खुंटलेल विसंवादि आयुष्य किमान आपल्या नशिबी नको म्हणून व्यक्त होणे माझ्यासाठी खूप महत्वाचे.. .त्यासाठी माणसे जपणे. कारण सरतेशेवटी We all sail in same boat.
मग प्रवास सुखकर होण्यासाठी हा व्यक्त होण्याचा घाट. .
काहींना काही निमित्ताने भेटत राहू, बोलत राहू , जगत राहू आणि आपण जिवंत मनाचे आहोत हे कमीत कमी स्वतःला सांगत राहू .
धन्यवाद 😊
Subscribe to:
Comments (Atom)








