ll श्री ll
प्रति,
IISER TEAM,
सप्रेम नमस्कार.
IISER PUNE आणि TATA
TECHNOLOGIES या दोन्ही मातब्बर
संस्थांनी सामाजिक भान लक्षात घेऊन एकत्र येऊन STEP FOR STEM – Through Hands on activities असा पुणे जिल्ह्यातील २०० शिक्षकांसाठी १० कार्यशाळा असणारा वर्षभर कार्यरत राहणारा एक कार्यक्रम
आरेखित केला. पुढची पिढी सक्षम करायची असेल तर त्यांची बौद्धिक क्षमता
आणि कौशल्य क्षमता वाढविणे गरजेचे आहे. मग या पिढीपर्यंत पोहचण्यासाठी सर्वोत्तम
दुवा म्हणजे ‘शिक्षक’.
शिक्षक हा समाजातील
असा घटक आहे की, जो त्याच्या कार्यक्षेत्रात दररोज नवीन अनुभव घेत असतो आणि
नवीन आव्हाने पेलत असतो. कारण त्याचा प्रत्यक्ष संबंध जिवंत माणसाशी येत असतो; ते
सुद्धा त्याच्या शारीरिक आणि बौद्धिक घडणीच्या काळात. शिक्षकाची
जीवनधाटणी कळत नकळतपणे विद्यार्थ्याच्या आयुष्यात उल्लेखनीयपणे कोरली जात असते. शिक्षकाकडे
नेहमीच देण्याची वृत्ती असते. या दोन्ही संस्थांनी समाजामधील हाच घटक हेरला - जो
सक्षम झाला तर निःस्वार्थपणे समाजाला सक्षम करेन.
IISER आणि टाटा TECHNOLOGIES
तुमच्या या विचार शक्तीला सलाम! या
विचाराने प्रेरित होऊन तुम्ही जिल्ह्यामधील १०० शाळांपर्यंत पोहचला. तुमची
भूमिका मांडली आणि त्यांचे २०० शिक्षक तुमच्यापर्यंत दर महिन्याला तेवढ्याच
उत्साहाने येतील आणि तेवढ्याच उत्साहाने टिकतील सुद्धा याची पूर्ण जय्यत तयारी, तजवीज तुम्ही करून
ठेवली. १८ जानेवारी २०१९ रोजी ह्याची मुहूर्तमेढ झाली आणि पूर्ण
रिकामा दिसत असलेला white board जेव्हा spray फिरवताच STEP
FOR STEM ने भरुन जातो तेव्हा इथे काहीतरी नक्कीच नवीन मिळणार आहे
याचे कुतूहल आणि आपल्या प्राचार्यांनी या कार्यशाळेसाठी
आपली निवड केली या जबाबदारीचे भान अशा दोन्ही बाबी मनात जागृत झाल्या होत्या.
उद्घाटन सोहळा तर
पार पडला. आता खरी कसरत सुरू झाली होती. त्यासाठी
पुढे सरसावली अशोक रूपनेर सरांची टीम. शिल्पा जैन, चैतन्य, श्रध्दा, नेहा, कर्णीका, प्रज्ञा,
अंकीश असे सगळेच बेस्ट
फलंदाज.....Devotee.... Pure
Science मधील masters...... एखादा
topic शिकवताना तो किती खोलवर विचार करून शिकवला पाहिजे याचे
मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ही पूर्ण टीम. आणि तो त्या टोकापर्यंत शिकवायचा
जोपर्यंत या समोरच्या शिक्षकांना समजत नाहीये. Yes..... मी
बरोबर बोलले. शिक्षकांना समजत नाहीये. अभ्यासक्रम
पूर्ण करण्याचा डोलारा माथी असणारा, अनेक शासकीय कामात गुंतलेला शिक्षक अद्ययावत होणे ही
काळाची गरज आहे. कारण शिक्षक ८०-९० च्या अभ्यासक्रमात घडलेला आहे. आता त्याच्यासमोर येणारा विद्यार्थी २१ व्या शतकातील
आहे. जो
जन्मतःच मोबाईल आणि टॅब वापरत आहे. ते ही कोणीही
न शिकवता... शिक्षक विद्यार्थ्यांमधील ही तंत्रज्ञानाची, वैचारिक
दृष्टिकोनाची दरी दूर करण्याचे काम IISER च्या टीमने चोख
बजावले आणि लीलया पार पाडले. तुमची मेहनत, पूर्वतयारी दिसत होती. एखादा प्रयोग
होत नसेल तर त्यांच्या तोंडून सहज येत होते अरे, काल तर झाले होते..... प्रत्येक
गटासाठी बॅचसाठी तुम्ही त्याच आस्थेने तयारी करत होता. कारण तुमच्या
नजरेसमोर
उद्याचा समाज उभा होता. बरे हे सगळे शिकवणे अगदीच हसत खेळत....... अशोक
सरांची टीम जरी काही शिकवत असली तरी अशोक सरांच्या चेहऱ्यावरची काळजी दिसत असायची.. सगळे
मुद्दे पूर्ण होत आहेत ना..... आणि हा मुद्दा मीच समजवायला पाहिजे या आस्थेने ते त्या
मुद्द्यावर activity विषयी बोलणे सुरू करायचे. पूर्ण
वेळसुद्धा ते उभे राहून असायचे. चैतन्य, श्रद्धा आमच्या साठी विद्यार्थ्यांसारखे... पण आदरपूर्वक सहज आम्हाला नियंत्रित करायचे. Pre
test post test मध्ये तर बिचाऱ्यांची
दमछाक केली असेल आम्ही. मूल्यमापन करताना Plickers
हाताळण्याचे प्रशिक्षण, आमची उत्तरे बघून आजचे सत्र यशस्वी झाले की नाही याचा अंदाज घेणाऱ्या तुमच्या नजरा, तुमची
अस्वस्थता सारे सारे लक्षात येत होते. तुम्ही So
called home work देत होता आणि आम्ही आज ना
उद्या नक्की हा अभ्यास पूर्ण करू असा विश्वास बाळगत होता. दहा
वेळा विचारा दहा वेळा तुम्हाला ते त्याच पोटतिडकीने सांगणार....... १५-२० वर्षे वर्गात शिकविलेल्या शिक्षकांना टाचण कसे काढायचे आणि वर्गातील मुलांवर नियंत्रण कसे
आणायचे , वर्गात शिकविताना वर्गाची रचना कशी असावी हा पाठ सांगायचा
म्हणजे खरेच एक आव्हान होते. कारण शिक्षकांना नवीन देणे आणि ते त्यांना पटणे, त्यावर त्यांनी आमअंमलबजावणी करणे गरजेचे होते. हे आव्हान नेहा आणि कर्निका ने सहज
पेलले. सगळ्यात मजा म्हणजे लँग्वेज.... भाषा
कोणती वापरायची...... अगदी पहिल्या कार्यशाळेत मराठी भाषेतून शिकविणे ही केलेली
मागणी नेहाला translator रोल देऊन गेली आणि आमच्यामधील अनेक शिक्षकांना इंग्लिशमध्ये समृद्ध करून
गेली. शिल्पा मॅडम चे administrative सूचना देणे, आमचे
फोटो काढण्यात busy असलेल्या
प्रज्ञा मॅडम , हे
सगळे आठवणींच्या कप्प्यात जपून ठेवले आहे.
आणि सगळ्यात
महत्वाचे म्हणजे content...आशय समृद्धता.......प्रत्येक शिक्षक
त्याच्या पोतडीत नवीन शोध लागल्यासारखा 'युरेका युरेका' म्हणत होता. कारण
श्रीमती इंद्राणी बालन या हॉल मध्ये तुमच्या भोवताली विज्ञान क्षेत्रात काय काय
घडत आहे याचे प्रारूप आणून ठेवले जात होते. आमच्या
समोर आणले गेलेले शास्त्रज्ञ अगदी विचारपूर्वक निवडलेले होते. हे लोक विषयाचा
किती सखोल आणि सविस्तर विचार करतात ह्याचा जवळून अनुभव घेता
आला. ‘साधी राहणी आणि
उच्च विचासरणी’ असे प्रत्येक शास्त्रज्ञाचे वर्णन करता येईल. विषयाच्या
कळसाला गवसणी घालणारा शास्त्रज्ञ पाय जमिनीवर ठेवून असतो म्हणजे नेमका कसा असतो
याचे उदाहरण म्हणजे आमच्याशी संवाद साधायला आलेले शास्त्रज्ञ....झोकून
देऊन काम करणारे सगळेच वल्ली.......
वेड भिनल्याशिवाय खरेच इप्सित साध्य होत नाही. आणि
प्रत्येकाची नवीन पिढीसाठी असणारी तळमळ तेवढीच तीव्र.....हीच
तळमळ आमच्या मध्ये जागविण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला.
डेव्हिड सरांनी story telling हे कसे कौशल्य आहे आणि logically ते अध्यापन तंत्र म्हणून कसे वापरता येते याची ओळख करून दिली
आणि आम्ही कार्यशाळेत रुळण्यास मदत झाली. शिक्षकीपणा सोडून विद्यार्थ्याच्या
भूमिकेत किती मजा असते हे आम्ही इथे जगलो. एवढ्या
activity केल्या की सगळ्यांच्या मनात मला ही activity करायला
कधी बोलवणार असा प्रश्न हमखास येत होता. पक्ष्याची शिट्टी वाजवून ध्वनी हा
धडा शिकताना तर पूर्ण IISER टीमला आम्हाला आवरणे कठीण होऊन बसले होते. मग ONE TWO म्हटल्यावर
EYES ON YOU म्हणत आम्ही so called
शांत व्हायचो. Housie हा मुलांचा किंवा किटी पार्टी
मध्ये खेळला जाणारा खेळ, आय के राणा सारखे शास्त्रज्ञ गणिती प्रक्रिया शिकविण्यासाठी
वापरतात हे पाहून त्यांच्या बुद्धिमत्तेला सलाम केल्याशिवाय रहावत नाही. Integers.... पळता
भुई थोडी ......असा हा धडा Hot balloon वापरून
हलकेच आम्हाला तरंगत ठेवणाऱ्या मंजुश्री धुमे, संस्कृतमध्ये
असणारा विज्ञानाचा उगम दाखवणारे नेमके संस्कृतचे अभ्यासक की विज्ञानाचे शास्त्रज्ञ
असे डॉ. रामकृष्ण
भट, कॅमेरा वापरून रेकॉर्डिंगचे प्रशिक्षण देणारे विवेक सर, प्राण्यांच्या आयुष्यामध्ये पण गूढ रहस्य असते याची जाणीव करून देणारे निशिकांत
सुभेदार, IISER चे सर्वेसर्वा अरविंद नातू सर, भौतिक
शास्त्रातील संकल्पना समजाविणारे चक्रदेव सर , चांद्रयान
टीम चे सदस्य स्रीजिथ सर, उष्णतेच्यामागचे गमक दैनंदिन अनुभवातून मांडणारे भास बापट सर अशा सर्वांनी बालन हॉल मध्ये विज्ञानाची
व्याप्ती आमच्यासमोर व्यापक स्वरूपात ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्या
हॉलच्या बाहेर जाऊन IUCAA भेट, मुक्तांगण भेट, IISER दर्शन , अगस्त्य
संस्थेचे विज्ञानाविषयी काम अशी अनेक दालने आमच्यासमोर खुली करण्यात आली. अपेक्षा
फक्त एकच आम्ही ही व्याप्ती अनुभवावी आणि ती आमच्या वर्गात अजून व्यापक करण्याचा
आणि त्यात या चिमुरड्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करावा.
बौद्धिक तृप्ती समवेत अगदी भोजन
तृप्तीदेखील तेवढीच प्रबळपणे पूर्ण करण्यात आली. म्हणजे
कशातच तडजोड नाही. सगळच भरघोसपणे भरभरून
देणे.
IISER ट्रेनिंग ला जाणार कळले की
विद्यार्थी विचारायचे आज नवीन कोणते मॉडेल आणणार? फुग्यांपासून ते लेझर पेनपर्यंत प्रत्येकाची एक पेटी तयार झाली आहे ....फुग्यांच्या
सहाय्याने तर किती वैज्ञानिक तत्त्व समजतात याची पानभर यादी तयार होईल. ही विज्ञानातील
कुतूहल वाढविण्यासाठी आणि शमविण्यासाठी समृद्ध आहे. इथे
प्रत्येकाला किमान १० मित्रांची साथ मिळाली. IISER च्या strong गटाचा support मिळाला. कधीही
फोन करून प्रश्न, शंका विचारा, त्यांच्याकडून कर्तव्य
भावनेतून त्याची पूर्तता होते.
एकच विश्वास देतो
आमची झोळी समृद्ध झालेली आहे. इथे
आम्हाला दिशा मिळाली, नजर मिळाली, इथे आलेला शिक्षक आता केवळ अभ्यासक्रमपूर्ततेसाठी
शिकवणार नाही. त्याला मिळालेल्या पोटलीतून तो वर्गात विज्ञानाचे विश्व
निर्माण करण्याचा सजग प्रयत्न नक्की करेल. आता 'आभारी आहोत' हे म्हणणे आमच्या कृतीतून दाखवून देऊ.
धन्यवाद!!
बॅच A
STEP FOR STEM
(शब्दांकन : सौ. स्मिता प्रवीण माने , JPNV निगडी)