Chillax.....
माझ्या शब्द कोशामध्ये नवीन शब्दाची भर पडली . Chill आणि relax यांच्या एकत्रीकरणातून Chillax ची उत्पत्ती झाली. .आणि याचे जनक म्हणजे सध्याचा teenage group..जो त्यांच्या आई वडिलांना शांत करण्यासाठी, प्रेमाचा सल्ला म्हणून CHILLAX हा शब्द प्रयोग करत आहे. अर्थातच या शब्द प्रयोगाने आई वडील शांत होत आहेत की अजूनच tense हे त्यांच्या प्रकृती वर अवलंबून आहे.
मी मात्र chillax ऐकून जरा curious झाले.
एक वेगळ्या धाटणीचा शब्द प्रचलित झाला आणि तो आपल्यापर्यंत पोहचला याचा भलताच आनंद मला झाला. 'Swag से करेगे सब का स्वागत ';अशा attitude मध्ये मला chillax शब्द प्रयोग करावा अशी प्रचंड इच्छा निर्माण झाली . किती cool...cooler...coolest approach..तो पण teenager चा.
या अनुषंगाने दोन गोष्टी प्रामुख्याने माझ्या समोर आल्या; एक तर, भाषेत प्रचंड वेगाने होत जाणारा बदल ,प्राकृत मराठी पासून , शुद्ध मराठी, प्रादेशिक मराठी, सदाशिव पेठ मराठी, असा सगळा मातृभाषेचा अभिमान जपणारा आपला गट हळुहळू Minglish, whatsapp marathi , english shortcuts, english combo असे काय काय नवे प्रयोग करत आहे आणि मुख्यत्वे हे बदल खूप सहज स्वीकारले ही जात आहेत. त्या मागचे एक कारण- जर हे भाषेत होणारे बदल मी स्वीकारले नाहीत, तर या communication च्या जगात मी मागे पडेल.. .so,मातृभाषेचा आदर मनात सदोदित उराशी बाळगून ,सद्य स्थितीत chillax राहून मी हा बदल आत्मसात करणार ...कारण मला सध्या जगाची भाषा कळणे आणि येणे जास्त महत्त्वाचे आहे . अजून दहा वर्षांनी जेव्हा माझा मुलगा या teenage चा घटक बनेल तेव्हा हा शब्द कोश किती आणि कसा 'प्रगल्भ ', 'संपन्न' असेल याची मी कल्पना करु शकत नाही परंतु, त्या साठी mentally prepare राहू शकते, हे मात्र नक्की.
दुसरी बाब हा chillax म्हणणारा गट , एखाद्या घटनेची तीव्रता ओळखून ,परिणामांची कल्पना ठेवून, त्या परिणामांना सामोरे जाण्याची पात्रता असणारा असल्यामुळे, प्रगल्भतेपोटी हा शब्दप्रयोग करत आहे का ?जर तसे असेल तर, त्यांचे हे वागणे कौतुकास्पद आहे ,कारण spiritual development आपल्याला सरतेशेवटी प्रत्येक घटनेचा शांतपणे च विचार करायला सांगते . ही अभिप्रेत असणारी शांती मिळविण्यासाठी सध्याचा प्रौढ वर्ग अनेक meditation ची दारे वाजवित आहे . प्रगल्भ teenage ला (?) हे अशाप्रकारे शांत राहणे लवकर लक्षात आले ;याचा नक्कीच आनंद
पण chillax शब्दप्रयोग करताना प्रत्येक गोष्ट lightly च घ्यायची ही प्रवृत्ती असेल तर, मात्र थोडी काळजी नक्कीच वाटेल. कारण कशाचा काही फरकच पडणार नसेल तर ....जगणे कोरडे बनेल ....chillax चा शेवट कोरडे पणात नसावा ...नाहीतर हळू हळू ही शांती आपल्यालाच खायला उठेल !!!
शब्दांची गंमत, भाषेतील बदल, हे काळानुरूप घडतच राहणार .. त्यात शंका नाही. ..पण एखाद्या वाहिनी वर 'मी मराठी' हे गाणे ऐकून वा 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' हे पद ऐकून क्षणभर काळजाचा ठाव घेतला गेला नाही तर मात्र ही वृत्ती आक्षेपार्ह ठरेल. .....
आई वडिलांना Chillax म्हणताना त्यांच्या मनातील काळजीचा वेध घेता येणार नसेल तर ही वृत्ती देखील आक्षेपार्ह ....आई वडिलांचे आयुष्य chill आणि relax ठेवण्याचे दायित्व आपल्याला chillax राहून घेता येईल का यावर एकदा फिरून विचार व्हावा ....एवढंच म्हणणे
Happy with this new word