Thursday, 16 August 2018

      मुहूर्त मुहूर्त मुहूर्त ...अखेर एकदाचा मुहूर्त लागला आणि 10 वी अ मराठी माध्यम मार्च 1999 चा वर्ग तब्बल 19 वर्षांनी पुन्हा भेटला ...हो हो भेटला!!!! कारण पण तसेच प्रबळ होते, आमच्या सुमारे 4 वर्ष वर्गशिक्षिका असणाऱ्या पत्के बाईंचा निवृत्ती सोहळा ....मग त्यांच्या वर्गात आपली उपस्थिती नव्याने नोंदवून जुन्या आठवणी जगायच्या ...असा in short घाट घातला होता.
10 वी अ. .नावातच लक्षात येत असेल की एकदम हुशार विद्यार्थ्यांचा धडाडीचा वर्ग ..yes! आम्हाला आयुष्यात यश मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार ..जेथे जावू तेथ तेथ विजय मेळवू...अशा सगळ्या आविर्भावात असतानाच...मध्येच मी आणि सीमा ने हा सोहळा करण्याचा विचार केला . तब्बल 19 वर्षांमध्ये प्रत्येकी कडे 10 एक जणांचे number होते ...खंत अशीच होती की जो वर्ग संस्कृत पद्य स्पर्धा ,समूहगान स्पर्धा, अशा एक ना अनेक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून एकी सिद्ध करत होता त्या वर्गाला आता एकत्र येण्याची इच्छा असूनही वेळ मिळत नव्हता वा काढता येत नव्हता. ..तरिही आम्ही वर्गातल्या 40 विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲप group तयार केला आणि साद घातली, हळू हळू मागे लागलो. ...मागे कसले; पिच्छाच पुरविला !!!दिवस ठरला, वेळ ठरली, सर्वांना आमंत्रण गेली, सर्वांनी तयारी देखील दर्शविली आणि मग कार्यक्रमाची तयारी सुरु झाली. मी, सीमा, संपदा, सायली ,प्रिया, रोहन असे सगळे कार्यक्रमाचे स्वरुप ठरवू लागलो ..आणि एका कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी जे जे करणे शक्य आहे ते ते ठरवले.
प्रत्येक विद्यार्थी 19 वर्षांनी शाळेत येणार होता, इथून बाहेर जाताना त्याच्याकडे शाळेचे प्रतिक असावे जे आधुनिक पण असेल आणि शाळेला पण सूचक असेल . पत्के बाईंना पण आम्ही लक्षात राहिलो पाहिजे असचं gift त्यांना द्यावं म्हणून मीना प्रभूंच्या पुस्तकांचा संच आणि सीमा ने लिहिलेले भावपूर्ण मानपत्र देण्याचे निश्चित केले ...असे सगळे ठरले
.      आणि 15 August आला ...वेळ पण झाली पत्के बाई देखील पोहोचल्या. . .मग विद्यार्थी ??? याच साठी केला होता का अट्टाहास !!!!असे काही बाही वाटू लागले, सीमा आणि माझा plan B फक्त 4-5 विद्यार्थ्यांचा presence या वर पण तयार होता, पण हा plan वापरावा लागू नये अशी मनस्वी इच्छा होती . 5S सीमा ,सायली, संपदा ,स्वप्नजा आणि स्मिता अशा शाळेत असताना च गट आलाच होता.... प्रसन्न ला फोन करताच पोहचतो म्हणत म्हणत,  तो दाराशी दिसला आणि hushhh झाल ..मुलांची खिंड त्याने सांभाळली श्वेता नाझरकर आली, म्हणून आनंदाने टाळी वाजवेन तो पर्यंत नयना येणार नाही हे कळले आणि हिरमोड झाला . आख्खी विद्यार्थ्यांची roll number प्रमाणे हिची यादी तोंड पाठ ..अगदी आजही ! !एक एक करता करता सगळे जमले आणि मन शांत झाले
पत्के मिस आल्याच होत्या, पण देवळेकर सर आवर्जून पूर्ण वेळ उपस्थित राहिले आणि आम्हाला अग्रणी प्राग्रणींचे दिवस आठवले. मग अनौपचारिक गप्पा मारायच्या होत्या ... पण त्या देखील साचेबद्ध . शेवटी प्रबोधिनी चे बाळकडू ....
एक साथ खडे होंगे खडे हो... सावधान ..ओम् ...वंदन ..नमस्ते ! एकदम भारी ..शाळेत असताना आपण सावधान होईपर्यंत मिस खाली बसा अशा म्हणायच्या आणि आज. .सगळंच वेगळे होते.
आणि मग गीतेचा 15 वा अध्याय म्हणायला सुरुवात केली ....पाठ होता ..शेवटचे दोन तीन श्लोक जरा जरा डळमळले पण लहानपणी तयार झालेली जीभ अशी सहजा सहजी विसरत नाही हे मात्र नक्की. मग प्रबोधिनी पद्य क्षितिज नवे मज सतत बोलवी. . ..हे पद्य सन्मित्र बरोबर घेवून म्हटले ....प्रबोधिनिचा एक समान धागा पद्य, बर्ची, उपासना. ..कधीही भेटले तरी लगेच नाळ जुळवितात.
मग मी उभी राहिले ..इतके दिवस हा घाट का घातला हे आज सांगायचे होते ..एक आणि एकच कारण मनात होते - ते म्हणजे ..जरा विसावू या वळणावर. ..खूप कमविले ..पण हे सगळं कमविताना ज्यांनी आपल्याला सक्षम बनविले त्यांना आपण हे सांगणे लागतो. ह्याच साठी एकत्र जमविले . बास!  आणि बाकीचे तर ज्याचे त्याला प्रत्येकाला कळले.
आठवणी जाग्या होवू लागल्या, कुठे कुठे वर्ग होते,  सु्रुवातीला ह्या इमारती मध्ये काय होते इथ पासून ते आता वर्गात बसविलेले cctv पाहुन आपण बरे झालो या cctv च्या नजरेतून सुटलो इथ पर्यंतचे समाधान होते. कोणत्या तासाला कोण झोपा काढायचे आणि कोण ओरडणी खायचे,  कोणत्या शिक्षिका काय शिक्षा द्यायच्या, का दिल्या, आणि आम्ही केलेले उद्योग ,( पत्क मिस ना चिठ्ठी प्रकरण चांगलेच आठवत होते,  खूप hold वर ठेवले मी त्यांना) आणि आज शिक्षा कशा बदलल्या इथपर्यंत सगळं discuss केलं. दलाला जाताना गणवेश बदलणे, पथकश : राखी विक्री, अग्रणी पद कोणी गाजवले ,नेप्र चे अनुभव असे सगळे विषय discuss केले .लक्षात येत होत की हा वेळ अपुरा पडत आहे, नुसता स्पर्श करत आहोत, पण हा स्पर्श देखील सुखाचा होता .
मग देवळेकर सरांचे अनौपचारिक मार्गदर्शन झाले. आणि शाळेत परत येण्याचे कारण त्यांनी सांगितले ..या नव्या पिढीला बाहेरच्या जगात काय काय वाटा आहेत हे सांगण्यासाठी कधीही शाळेत या. .अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुमची मदत होवू शकते . शाळेच्या प्राचार्य प्रज्ञा ताई पाटील, आमच्या इंग्लिश च्या शिक्षिका ह्यांनी देखील उपस्थिती नोंदवून आम्हांला आनंदीत केले. 
आणि मग सीमाचे वर्गाच्या वतीने पत्के मिस साठी भावपूर्ण पत्र ,सगळ्यांनाच सद्गदित करणारे, वीस वर्षांपूर्वीचा आपला आणि मिस चा ऋणांनुबंध प्रत्यक्ष प्रकट करणारे असे ते ओघवते शब्द! !! सगळेच शांत. ..
मग आमच्या बाईंनी या पत्राला दिलेले उत्तर - मी फक्त तुमची आई बनण्याचा प्रयत्न केला. मला ज्या गुरुनी शिकविले ते मी तुमच्या पर्यंत पोहचवायचा प्रयत्न केला . खूप प्रामाणिक प्रयत्न !!
मग सायली ने games घेवून वातावरण relax केले . केदार वृंदा दीपा ह्यांना मिस करतच होतो ;त्यांनी video call ने उपस्थिती नोंदविली .आणि तंत्रज्ञानाने आपला सहभाग नोंदवला .तेजा प्राजा मजल दर मजल करत पोहचल्या आणि त्यांनी commitment पाळली . That's appreciable!!
मग पावभाजी पुलाव अशा मेनू वर ताव मारला. आणि मग गप्पांना पुन्हा रंग भरला .मग आपण असेच वर वर भेटलो पाहिजे या निकषावर सगळे आले आणि मी मनात hushhh म्हणाले .आणि पुढचा plan करणारा कोण ठरणार यासाठी सगळ्यांनी धनंजय कडे माना वळविल्या. अब आयेगा मजा 😂
Love u all...तुमची नेहमीच आठवण येत होती ..आज भेटलो. ..असेच भेटत राहू