शांत व्हायचंय। त्या शांतीची जी काही depth असेल ती अनुभवायची आहे.एक प्रकारचे स्थैर्य , स्थिरता आणि ते पण दीर्घकाळ टिकेल याची ग्वाही हवी.
ही मनातील खलबतं थांबतच नाहीत. म्हणजे, आयुष्यात काही तरी सतत happening घडावे, अनुभवायला मिळावे, याचा सतत अट्टाहास सुरू असतो;पण ह्या सगळ्या गोष्टी मनातच एवढा उच्छाद मांडतात की, त्यांचा कधी कधी गोंगाट होतो आणि happening गोष्टींची चलबिचल मनाच्या चौकटीपर्यंतच येरझार्या घालते आणि productivity मात्र पाहिजे त्या प्रमाणात दिसत नाही.
ही खलबतं बघायला गेलो तर -स्वीय ,कौटुंबिक ,सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा प्रत्येक पातळीवर आपण लढत असतो आणि त्याच्या प्रासंगिक either झळा or झुळूक आपल्या वाट्याला येतात आणि मग तद्नुसार विचारांची आंदोलने हेलकावे घेऊ लागतात.
ह्या आंदोलनांचा base पकडायचा म्हटलं तर, हा पूर्ण प्रवास हा अपेक्षाांच्या शिदोरीवर अवलंबून आहे either समोरच्या व्यक्तीला आपल्याकडून असलेल्या or आपल्यालाच त्या व्यक्तीकडून किंवा स्वतः कडून असलेल्या अपेक्षा !!सूत्र एकच अपेक्षा !!!स्तर भले emotional असेल वा practical. सगळेजण या अपेक्षाच कुरवाळत असतात🙊
वयपरत्वे, कालपरत्वे ,अनुभवाने, भले तुमचा रोल बदलत असेल पण हा बदल केवळ अपेक्षाांच्या formatमध्ये घडलेला असतो .घडणाऱ्या घटनांचे कालपरत्वे फक्त repetition होत असते. खिलाडू वेगळे.इथला प्रत्येकजण मी किती खरा, मी किती सरस, हेच सिद्ध करण्याच्या मागे ....
स्वतः चे अस्तित्व वलय निर्माण करण्यासाठीची ही पळापळ.....
आयुष्य सुंदर रेखाटण्यासाठी अपेक्षाांचे रंग मदत करतातच ..पण अतिरेक रंगाचा बेरंग करू शकतात, हे दुर्लक्ष करून चालणार नाही .डोळे बंद केल्यानंतर आपल्याला अपेक्षित असलेले चित्र बघायचे असेल तर ,कुंचला नीट धरता आला पाहिजे ;रंग पारखून घेतले पाहिजे;
पुन्हा अपेक्षित चित्र .......ही अपेक्षा खरंच पाठ सोडत नाही😷
स्वतः च्या कोशात राहून, आवडीच्या गोष्टींमध्ये रमून, गाण्यांच्या सूरांबरोबर शब्दांबरोबर स्वतः ला connect करून,आपल्याबरोबर tuned असलेल्या माणसाबरोबर गप्पा मारून, आईच्या मांडीवर डोके ठेवून, ही शांतता लाभेल फक्त तिच्या स्थिरतेची शाश्वती देता येत नाही....😐
स्वतः स्वतः पासून अलिप्त झाल्यावर जी शांतता लाभेल कदाचित मला ती शांतता अभिप्रेत असेल !!मान्य आहे त्यासाठी संन्यासी च व्हावे लागेल 💁
दुनियादारीशी संबंध आला की बाकी कुठे नसलं तरी मनात सतत happening घडतंच राहणार. त्रयस्थपणे फक्त त्यांचे साक्षीदार बनूया....
Take care!🙏
No comments:
Post a Comment