नेटाने म्हणजे अगदीच नेटाने सगळं अनुभवायचे , आपल्या बाबतीत काय काय घडत आहे आणि कशा प्रकारे घडत आहे हे त्रयस्थतेने पहायचे, असे ठाम ठरवूनच सध्या मी वागत होते.
तर हे सगळं कशाच्या बाबतीत ......अगदी सुरुवातीपासून च्या आठवणी ....लहानपणापासूनच एक खेळ नियमाने खेळायचे....शिक्षिका शिक्षिका ..माझ्या वर्गातील मुले म्हणजे घरात असणाऱ्या फरश्या! मैत्रिणी घरी मुक्कामी आल्या तरी बिचाऱ्याना compulsory माझे विद्यार्थी बनावे लागत होते. नकळतपणे शिक्षिकेचा role हा DREAM ROLE झाला . माझे upbringing हे पुस्तकांच्या साथीत घडत होते .अवांतर वाचन तसे कमी होते ...अभ्यास अभ्यास हाच नुसता असायचा . पण तेथे रमायचे मी .कोणीही बळजबरी करत नव्हते. एकदा शिकविणे म्हणजे दोनदा शिकणे ही अशा स्वरुपाची philosophy अगदी ठाम होती. का कोणास ठाऊक ..माहित नाही पण इतरांच्या तुलनेत व्यवहार ज्ञान कमी होते की माझे लहानपणापासूनच शैक्षणिक क्षेत्रावर प्रेम होते (आंधळे ) ,नेमके कारण सांगता येणार नाही पण वैद्यकीय क्षेत्राचा प्रवेश नाकारून मी माझ्या वडिलांचा पहिला रोष ओढवला . बाकिचा शैक्षणिक प्रवास सुरू होता . पण त्या बाबतीत योग्य असे मार्गदर्शन आणि माझी धडपड कदाचित कमी पडली . B.Ed. ला प्रवेश घेतला तेव्हा तेथील विद्यार्थी हे by choice म्हणून या क्षेत्रात नव्हते तर आता फक्त एवढाच choice शिल्लक आहे हा साक्षात्कार झाल्यामुळे आले होते. मी मात्र अजुनही by choice म्हणूनच तिथे आले होते .5 मिनिटांच्या micro teaching मध्ये किती गोष्टी शिकवू शकतो हे बघून मला खरोखरच 5 मिनिटांची किंमत समजली. एखादी बाब समोरच्या व्यक्तीला समजावून सांगू शकलो ही जाणीवच समाधान देवून जाते .
ज्ञान प्रबोधिनी माझी शाळा, तिथेच काम करण्याची संधी त्यामुळे आनंदी होते. पण काही क्षण असे असतात जेथे तुम्हाला तुमच्या priorities ठरवाव्या लागतात . अशा वेळी by default तुमची priority तुमचा मुलगा आणि कुटुंब असते असे वाटले आणि प्रवास अर्धवट सोडला. सगळे निर्णय माझेच होते त्यामुळे त्यांची जबाबदारीही माझीच होती . पण माझे बालपणीचे प्रेम अधून मधून डोकावत होते. सासरची सगळीच मंडळी वकिली क्षेत्रात , मी या क्षेत्रात आले नाही ही खंत अण्णा ना (माझे सासरे ) नेहमीच वाटते. पण प्रेम मध्ये आले, स्वतःचा पिंड चांगलाच माहित होता. स्वतःशी प्रतारणा नाही करू शकत . मग guest lecture, संस्कृत चे class घेवून त्या वेळेस एकदम भारी वाटून घेत होते . संस्कृतची सुभाषिते, श्लोक खरोखर तत्त्वज्ञान सांगतात. एक एक सुभाषित हे itself जीवनाचे सार सांगतात . तुमच्या बुद्धिला खाद्य मिळाले की नवीन उर्जा मिळते , हे नक्की .
माझ्या priorities ह्या वेगळ्या आहेत ही खूणगाठ बांधली होती ,पण म्हणावे त्या आनंदाने कदाचित स्वीकारली नव्हती . Everything was fine...still something was missing.
आणि एक दिवस ज्ञान प्रबोधिनीतून पुन्हा offer येते , सगळ्या गोष्टी अशा तऱ्हेने जुळून येतात की वाटावे कोणीतरी हळूवार जादूची कांडी फिरवत आहे. ह्या गोष्टी अशा दिवशी , अशा वेळी घडून याव्या की अद्वैत शक्तीच्या अस्तित्वावर तुमचा विश्वास अजून दृढ व्हावा आणि कोणी मान्य करो वा न करो , आपण केवळ त्या अनुभूतीत रमावे . एकदम विलक्षण असे . आयुष्यात नेमके missing काय आहे हे समजावे ...नव्हे गवसावे....त्याच वेळी ठरवले आता फक्त त्रयस्थतेने काय आणि कसे घडते हे पहायचे ...
या नव्या वाटेवरचा आजचा पहिला प्रवास ...खूप शांतपणे नेहमीच्याच वाटेवरून नव्याने गेले...ज्योतिर्हम .... उपासनेतले हे शब्द मनाला स्पर्शून जावे ...अगम्य अशी शांतता ...स्वतःच्या क्षमतेची पुनर्तपासणी , स्वतःच्या निर्णयाची चाचपणी, भविष्यातील कार्याविषयी अंदाज , ठोकताळे, सगळंच साठवून ठेवावे असे.
महेंद्रभाईंचे वाक्य मनापासून पटले Analysis analysis leads to paralysis...खूप चिकित्सा करण्यात खरोखर अर्थ नसतो . एक quote आठवतो -Never expect
Never assume, Never ask and never Demand, Just Let it be ., if it's meant to be it will happen.
Really happy for the things which are happening. Thanks to wellwishers.