Thailand स्त्री साम्राज्य
नुकतीच Bangkok -Pattaya अशी 4-5 दिवसांची छोटी trip करून आले. छान निवांतपणा मिळाला. अजिबात घाई गडबड नाही ,पळापळ नाही. मनाला वाटेल तेव्हा आजुबाजूच्या परिसरात एक चक्कर मारून येणे , सकाळच्या वेळेत ठरवलेले sight seeing करणे, असा सहलीचा मस्त आराखडा होता. आयुष्यात नुकत्याच घडलेल्या शारीरिक, मानसिक अस्थिरतेपासुन बाहेर पडण्यास एक खूप छान break मिळाला. म्हणूनही ही trip अजून महत्त्वाची ठरली .
Thailand बघायला गेलो तर एक छोटासा बेटवजा देश . कमी लोकसंख्या असणारा , लोकशाही असणारा देश. प्रगत की अप्रगत हे exactly सांगता नाही येणार , पण देशाची प्रगती जर Basic infrastructure वर अवलंबून असेल तर त्यांचे लांब , रुंद रस्ते, उड्डाण पुले , उंचच उंच इमारती (for hotels only), पर्यटन स्थळांचा maintainance, या सगळ्या वर घेतलेली मेहनत, aदेश प्रगती पथावर असल्याचे सूचित करत होता . देशात सध्या 4 वर्षे अंतर्गत कलहामुळे निवडणुका झाल्याच नाहीत आणि आता सध्या लष्कराचे नियम लोकांना पाळावे लागत असल्याचे आमच्या tour guide ने सांगितले . पण सगळीकडे देशाच्या राजाचे आणि त्याच्या मुलाचे भारदस्त photoes, हो photoes च म्हणू शकतो🙊, आपल्याकडे banners असतात 😹,आपल्याला बघायला मिळतात.
तिथे जी कोणी Thai मंडळी भेटली ती अतिशय नम्र , मधाळ आणि लांबलचक सूर लावून बोलणारी होतीa. madam ला 'मदाम' म्हणून, आदरयुक्तपणे, लडिवाळपणे आपले तोडके मोडक English आपल्या गळी उतरवत होती. एवढा पर्यटनासाठी प्रसिध्द असलेला देश, पण जागतिक भाषा इंग्लिश न येण्याचे guilt एकाही Thai मंडळी च्या चेहऱ्यावर मला दिसले नाही. नाही कळले तर, हातवारे करतील किंवा Google बाबा च्या google translator चा आधार घेतील, पण sorry, i don't understand English असा सूर त्यांच्या कडून कधीच आला नाही ...असा सूर मला नेहमीच आपल्याकडे प्रकर्षाने जाणवतो.. .कारण आपलं नेहमीच इंग्रजांच्या वाचून अडते. असो ..हा सध्या माझ्या अभ्यासाचा विषय नव्हता ...फक्त एक दुखरी नस .
त्यांच्याकडे vegetarian and nonvegeterian असा काही प्रश्नच नसतो. ते एक फक्त पोटाला लागणारे , सहजरित्या उपलब्ध असणारे अन्न असते . शाकाहारी लोकांनी आपापल्या risk वर आपले अन्न शोधून काढावे. तसे एवढे कष्ट पडत नाहीत त्यासाठी, कारण almost दोन restaurant नंतर तुम्हाला Swagath, little India, Madras Darbar, Great Punjab असे अनेक भारतीय पद्धतीचे जेवण देणारे हॉटेल्स दिसतात आणि त्यावरुन लक्षात येते Thailand ला जाणाऱ्या भारतीयांची संख्या किती असेल!! ज्या हॉटेल्स मध्ये उतरलो होतो ते 15-16 मजली हॉटेल्स वेगळे Indian रेस्टॉरंट चालवू शकतात, कारण भारतीयांचे तिथे जास्त प्रमाणात येणे जाणे आहे . थोडक्यात त्यांची Economy ही भारतीय आणि Chinese यांच्यावर अवलंबून आहे . तिथे Indian Town आणि China town अशी दोन नगरे वसलेली आहेत .
देशाचा मुख्य धर्म हा बौध्द हाच आहे. बुद्घांच्या अजोड अशा उंचपुऱ्या, शांत, प्रसन्न मुर्त्या बघून बौध्द धर्माच्या तत्वांची खऱ्या अर्थाने साक्ष पटते आणि अभ्यासपूर्वक बौध्द धर्म स्विकारणारा संन्यासी किती धीरगंभीर वृत्तीचा असू शकतो याची कल्पना आली . सम्राट अशोकाने आपल्या मुलांना या धर्माच्या प्रसारासाठी त्या ठिकाणी पाठविले होते असा इतिहास आमच्या अहो नी च मला सांगितला ....
Sight seeing मध्ये मुख्यत्वे आम्हाला wild life चाच परिचय, अनुभव आला . Sriracha Tiger zoo आणि Safari world मध्ये प्राण्यांना ज्या प्रकारे प्रशिक्षण दिले होते ते खरोखरच प्राण्यांच्या आकलन शक्ति च्या बाबतीत आणि माणसाच्या आवाक्याच्या बाबतीत अचंबित करणारे होते. प्राण्यांची ज्या प्रकारे निगा राखली जात होती , तेथील स्वच्छता , प्राण्यांना उपलब्ध असलेली प्रशस्त जागा या बाबी,p पर्यटनामुळे मिळणारा पैसा योग्य प्रकारे वापरला जात असल्याचेच द्योतक होता. म्हणजे जी प्रणाली यासाठी कार्यरत होती ती खरोखरच स्तुत्य होती. Crocodile show, tiger show हे जिवावर बेतणारेच show होते . भले आपले मनोरंजन होत असेल पण कुठेतरी त्या माणसाबद्दल, प्राण्यांबद्दल करूणा वाटल्याशिवाय रहात नाही.
आणि हो आता जरा मुख्य मुद्द्याकडे येते. ..या देशाची सगळी economy सांभाळणारी , या hospitality चा मुख्य आधार असणारी, त्यांच्या लोकसंख्येचा अधिक भाग असणारी त्यांची स्त्री शक्ती . हॉटेल्स म्हणू नका , sea island वरील sports चे management म्हणू नका , प्रत्येक दुकानांमध्ये त्यांचा मालकीवजा वावर। मग ते street food shop असो , Thai massage असो किंवा मोठ्या malls मधील shops असो, किंवा gems sovenier मधील दागिन्यांची घडणावळ असो, प्रत्येक ठिकाणी या हजर. स्वतः च्या fitness ची , सौंदर्याची , त्वचेची काळजी घेत या तुमच्या सेवेला हजर . तिथे ही कामे पुरुषांची आणि ही स्त्रियांची अशी विभागणी नाहीच. मोपेडवर स्वतः च्या food shop मध्ये आवश्यक असणारी सामग्री मोठ्या प्रमाणात आणण्यासाठी याच सज्ज दिसत होत्या, रस्त्यांवर काही डागडुजी, खोदकामं चालू असतील तर full covered टोप्या घालून या महिलाच कामं करत होत्या . पर्यटकांना दुसऱ्या island वर घेवून त्यांचे management करणाऱ्या आणि safari world, tiger zoo अशा wild life बरोबर लीलया वावरणार्या याच होत्या. Then it doesn't matter it is Big Tiger or tiger cub or any owl !
त्यांच्या साठी हे एक काम आहे आणि मला जगायाचे असेल तर ते काम मलाच करणे गरजेचे आहे . हे काम मी कसं करू? अशा प्रकारचे कोणतेही प्रश्न चिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर नव्हते. It's just struggle for existence phenomenon. माझा एवढा अभ्यासही नाही , मला दिसणाऱ्या गोष्टी केवळ tip of iceberg असतील, पण काही बाबी जेव्हा कायद्याने मान्यता दिलेल्या असतात, तेव्हा या स्त्रिया किती प्रमाणात practical आणि mentally prepared असतील याची मी कल्पनाही करू शकत नाही . May be त्यांचे upbringing ज्या परिस्थितीत झाले त्या परिस्थितिने त्यांना तग धरायला शिकविले असेल . कारण एवढी कष्टाची कामे करुनही स्वतःचा नाजूक पणा त्यांच्याकडे अबाधित होता . आमची guide खूप सहजपणे सांगून गेली I have son of age 17. मग आपल्या संस्कारांना अनुसरून आमचा पुढचा प्रश्न तिच्या नवऱ्या विषयी होता आणि तिने तेवढ्याच सहजतेने उत्तर दिले I have no husband...we don't expect anything from him. We just let him to go. Don't insist him to take our responsibility. As per our Government rule Mother has whole responsibility of her child and not THE father.
ही वाक्ये माझ्या पचनी पडणारी नक्कीच नव्हती . पण तिच्या साठी हे सहजरित्या (?)स्वीकारलेले सत्य असावे अशा सुरात ती बोलत होती. स्त्री कणखर असते हे मला माहिती होते पण तिच्या मधील मातृत्व तिला कणखर बनवते हे नक्कीच त्या दिवशी पाहिले .
Darwin चे जगण्या बद्दलचे नियम अजून दृढ झाले . देशाची आर्थिक व्यवस्था जी स्त्री स्वतःला पणाला लावून सांभाळते तो देश प्रगत म्हणायचा की अप्रगत हे मला लक्षात येत नाहिये ..पण तेथील कार्यक्षम स्त्री नक्कीच प्रगत. तिच्या साम्राज्यास माझा तिच्या सारखाच लडिवाळ नमस्ते 🙏😘






