.
Hi.... सगळं कसं चिडीचूप
झाले आहे ना.... मला हे करायचे , मला ते करायचे, हे असेच झाले पाहिजे, मला असेच
लागते... मला वाटलं म्हणून हे केले. सगळच शांत एका क्षणात... सगळं कडीकुलूप बंद!
मग कशासाठी होती ही धडपड.... केवळ कटपुतली आहोत का आपण? पुन्हा पुन्हा हेच सिद्ध होणार आहे का? ‘आनंद’
चित्रपटमधला famous dialog..बाबू मोशाय... ‘हम सब तो रंगमंच की कटपुतलीया है!’
If you can’t go out
side go inside! अनेकांनी हे या आधी बऱ्याचदा सांगितले. पण ..पण आता ते बहुतेक
पटायला लागले असावे म्हणून अनेकांच्या whatsapp status वर झळकत आहे. मानवी जन्म
लाभला आहे हो मला. भूक, भय, निद्रा, मैथुन या चार गरजा मला प्राणी या जगतात स्थान
देतात. but...m gifted one! माझी बुद्धी..मला मिळालेली ही देणगी मला कालपरवापर्यंत
उच्च स्थान देत होती. मला पडणारी स्वप्ने मला स्वस्थ बसू देत नव्हती. शृंगार, वीर,
करुण, रौद्र, हास्य या नवरसांनी मी नटत होतो. माझे भविष्य लिहिण्याचा आणि
घडविण्याचा अविरत प्रयत्न करत होतो. नजर केवळ भविष्याचा वेध घेत होती. तिथपर्यंत
पोहचायचे आहे. त्यासाठी हा protocol. तो continuously follow करायचा. हा कोरोना
येईपर्यंत या दिनक्रमात काहीच fault नव्हता. आम्ही आनंदी होतो, सुख दुःख जसजशी येत
होती त्याला सामोरे जात होतो. आम्ही जगत होतो.
पण आता... एका क्षणात
सगळे statue ! भविष्य नेहमीच अंधारात असते हे पटायला लागले.
आपण नेमके का जगत आहोत? या जन्माचा काय नेमका हेतू? हे
प्रश्न आता पडायला लागले आहेत. आपला survival factor नेमका काय आहे? आजचा दिवस
माझ्या आयुष्यात आला आणि हा दिवस मी नेमका कसा जगत आहे? कामासाठी मी आहे की
माझ्यासाठी काम आहे? जगण्यासाठी जी जी आवश्यक कौशल्ये असतात ती मला माझ्या शाळेने,
कुटुंबाने, परिस्थितीने दिली आहेत का? परिस्थितीला
तोंड देण्याची भावनिक, आर्थिक कुवत माझ्यामध्ये आहे का? माझी मानसिक आणि शारीरिक
क्षमता यांचे लागेबंध आहेत का? या सर्वांची उत्तरे शोधण्याची ही वेळ आहे. उत्तरे
जर “नाही” असतील तर मी केवळ परावलंबी आहे... हातात असलेला वेळ ही उत्तरे “हो” कशी
करता येतील यावर काम करण्याचा आहे असे नक्की वाटते.
हे lockdown कधी संपेल
आणि काय याचा जर सतत विचार करत राहिलो तर पुन्हा पुन्हा तीच चूक करू... अंधारात असलेल्या
भविष्यासाठी आधी शरीराची तगमग केली आता मनाची घालमेल करू. खूप प्रश्न आहेत. खूप...
नोकरी टिकेल की नाही, व्यवसायाचे काय होईल? घराचे, गाडीचे हप्ते या प्रश्नापासून
आज संध्याकाळी जेवण मिळेल की नाही इथपर्यंत प्रत्येकाच्या आयुष्यात प्रश्न निर्माण
झाले आहेत. आज account ला पैसे आहेत पण खर्च कुठे करायचा हा प्रश्न आहे आणि
दुसरीकडे सरकार मदत देऊ करत आहे पण माझ्याकडे account च नाही असे प्रश्न आहेत.
सगळेच जण एका स्तरावर आलेले आहेत. आयुष्य टिकवायच आहे... बस... सर्वांची एकच
इच्छा!
सध्या दुसरा दिवस आपल्या आयुष्यात येणे हाच बोनस असणार आहे.
शाळेत हसरी बोल फुले काव्य संग्रहच्या निमित्ताने नवा
दिवस ही मंगेश पाडगावकर यांची विश्वास जागवणारी कविता वाचनात आली. सध्या साहित्य
वेगवेगळ्या स्वरुपात इतके भेटीस येत आहे की आपल एवढे वाचन राहिले होते हा
प्रश्न पडावा. प्रत्येकाला काही ना काही
सांगायचे आहे. पण ऐकणारा समोर नाहीये. मग त्याला अनेक माध्यमातून मी सांगत आहे,
त्याचे ऐकत आहे. मला जगण्यासाठी हे संभाषण आवश्यक आहे. मला हितगुज करायचं आहे, ते
ऐकणार, समजून घेणार कोणीतरी हवं आहे. मग
ते सार्थ तत्वज्ञान असो किंवा वायफळ बडबड असो, हे संभाषण मला हवे आहे. इतके दिवस
ज्या मोबाईलला सगळे दोष देत होते, तोच आज तारणहार म्हणून मदतीला आला आहे. ज्ञान,
मनोरंजन, भाव सगळी गरज तो भागवत आहे.
हेच सगळे दृष्टिकोनातील बदल घडत आहेत.. स्वतःमध्ये
होणारे बदल अनुभवा. हा दिवस, हा क्षण मी कसा घालवत आहे हे बघा. मज्जा येते. एक
वेगळा आनंद असतो. मी बदलत आहे हे आपलं आपल्याशी एक गुपित आहे. “बदल अपरिहार्य असतो’
या बदलाचे आपणच आनंददायी साक्षीदार या वर्तमान घडीला होऊया.
कोणताही बदल आचरणात
आणायचा असेल, कोणतीही गोष्ट सवयीची व्हायची असेल तर ती किमान 90 दिवस करावी लागते.
चीनचा lockdown 90 दिवसांचा होता. घरात राहणे हे सवयीचे होऊ लागले तर? आज जसे घरात
राहणे त्रासाचे तसे उद्या बाहेर पडण्याची वेळ आली तर ते त्रासाचे होऊन कसे चालेल?
आपल्याला आपला survival
factor सक्षम बनवता आला पाहिजे. जो मला परिस्थिती समोर उभे राहण्यास मदत करेल. परिस्थितीनुसार माणूस बदलतो. त्याला बदलावे लागते.
तर आणि तरच तो तग धरू शकतो. पण हा बदल जेवढ्या लवकर स्वीकारला जाईल तेवढ्या लवकर
वर्तमान सुकर, सुसह्य होत जातो. याच भूमिकेतून भविष्य पण कधीतरी वर्तमान होणारच आहे की. तो
वर्तमान पण तितकाच सुकर, सुसह्य होईल.
आजचा
क्षण साठवूया... समृद्ध करूया... तोच शिदोरी म्हणून साथ देणार आहे.
सुंदर लिहीलं आहे. भावनांना हात घालणारं. वास्तव परिस्थिती समोर मांडणारं. आज सर्वच जण एकाच platform आले आहेत हे एकदम पटलं.
ReplyDeleteखरं आहे ताई
ReplyDeleteछान मांडलयत वर्तमान
This comment has been removed by the author.
ReplyDeleteThanks a lot
ReplyDeleteस्मिता छान लिहिलंय,तसे सगळेच आत्ता अंतर्मुख होत आहेत,तुझे विचार वाचून त्या अंतर्मुख होण्यास नक्कीच दिशा मिळू शकते.
ReplyDelete