Monday, 12 March 2018

अनाकलनीय

       आज cocktail हा पिक्चर बघत होते.  माझ्यासाठी काही चित्रपट हे ठेवणीतले असे आहेत , Jab we met, Namaste London,  3 idiots, कट्यार काळजात घुसली, .. त्यापैकीच Cocktail हा एक . या  चित्रपटामध्ये कोणताही समान धागा नाही , तरीही ते मला एका जागी खिळवून ठेवतात  हे  मात्र नक्की . शेवटी 'चित्रपट' ही व्याख्या  पूर्ण होण्यासाठी , त्यांचा शेवट हा गोड होणारच पण; ती जी overall process आहे ना ,ती मनाला स्पर्श करुन जाते ...किंबहुना ,तिचा प्रभाव, हा दिर्घकाळ टिकतो. 
       Cocktail मध्ये सैफ चा एक dialogue आहे,  "मै ऐसा हो ये कभी नही चाहता था "(when he finally fell in love with Diana), पण, Alas!! घडलेच ... पिक्चरच तो ...घडून येणारच होते असे .
     पण ज्या पध्दतीने घडले ती process खूपच आगळी होती . 
आपण खरोखरच आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत mentally prepared नसतो. हे फक्त प्रेम किंवा तत्संबंधी नाही. ...खरोखरच आपण खूप साऱ्या बाबतीत prepare नसतो,  आपली acceptance level तेवढी powerful नसते आणि मग त्यांचा प्रभाव वाढत गेला की  आपले calculations चुकू लागतात ...अरे, अस घडावे ? माझ्या बाबतीत घडावे? कस शक्य आहे हे? ही phase किती दिवसांची सोबती? कस निभावून नेणारे सगळ? असे अनेक प्रश्न.. ...आपण किती strong आहोत हे फक्त आणि फक्त आपल्यालाच माहित असते . मग calculations बरोबर येण्यासाठी आपण manipulation करु लागतो .
     त्यानंतर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा घाट सुरू होतो.  उत्तरे शोधत आहोत की  अजून खोल गर्तेत जात आहोत हे सर्वस्वी आपल्या कौशल्यपूर्ण विचारांवर आधारित असते .
    कार्यकारणभावावर सगळा खेळ सुरु असतो. ही जी कार्य कारणभावाची अनाकलनीय अशी process आहे ना ती मला खूप important वाटते. कारण शेवट तर नेहमीच गोड होणार असतो , या शेवटाकडे जाताना तुम्ही ज्या पध्दतीने तग धरता...That sounds your perfection 😌
      तुम्ही म्हणाल एवढा छान हलका फुलका चित्रपट , relax व्हायच की तत्त्वज्ञान शोधत बसायचे 😺 परंतु हलक्या फुलक्या गोष्टीतूनच जीवनाचे मर्म कळते ना ...लहानपणीच्या  गोष्टी आजही आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात .
      मला समजलेला मानवी स्वभाव म्हणजे कोणत्याही प्रसंगात माणूस त्या ठिकाणी स्वतःला judge करत असतो , चित्रपट तर त्याची हक्काची जागा!!!आपण काय केले असते बरे ? किंवा या गोष्टींपासून आपण दूर आहोत हेच बरे! !!कदाचित माझा हा विचार  स्वाभाविकच असावा .
       आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना आपण विचार करो वा न करो,  आपण Strong असो वा नसो,  त्या घडत राहणारच. तुमचे calculations पुर्ववत करावयाचे असतील तर तुम्ही किती लवकर त्या घटनेचा स्वीकार करता यावर गोष्टी अवलंबून असतात. ..
        Afterall हे आयुष्य, अनाकलनीय बाबींचा उलगडा करण्याचा एक महायज्ञ ...सो आप चाहो या ना चाहो ;हे सगळं घडत राहणार आणि या महा यज्ञ तुम्हाला तुमची आहुती द्यावी लागणार. ..शेवटी इदम न मम ..हाच गोड शेवट ना !!,😊

11 comments:

  1. Smita ! Your style of writing is too good .

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. जीवनाचे cocktail .....👌👌👌👌👌👌

    ReplyDelete
  4. Sahi, real fact in appropriate words. Plz do keep writing, unconsciously we are aware of it, but at times we do need to be conscious (jaage hone).

    ReplyDelete
  5. Feels as if we are actually having this discussion over Cocktail.. :-)
    Chhan vyakta zaliyes... loved it.. keep it up

    ReplyDelete